पारोळा येथे तीन दिवस जनता कर्फ्यू

0

पारोळा (प्रतिनिधी) :पारोळा शहरात तीन दिवस १मे ते ३मे पर्यंत असे तीन दिवस जनता कर्फ्यू चे आवाहन पारोळा येथील सर्व व्यापारी असोसिएशन कडुन करण्यात आले आहे, या बाबत अधिक माहिती अशी की पारोळा तालुक्यातील जोगलखेडे येथे कोरोना पाॅझिटीव्ह व्यक्ति आल्याने शहरात तसेच संपूर्ण तालुक्यात घबराहटी चे वातावरण निर्माण झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर पारोळा शहरातील प्रमुख व्यावसायिक व व्यापारी असोसिएशन ने १मे ते ३मे असे तीन दिवस जनता कर्फ्यू चे आवाहन केले आहे याबद्दल सांयकाळी संपूर्ण शहरात रिक्षा वरून तीन दिवस मेडीकल व दुध डेअरी याना वेळेचे बंधन घालुन दिले आहे, हे वगळता इतर सर्व प्रकारचे दुकान बंद राहातील जसे किराणा दुकान, भाजीपाला, व इतर जे काही आवश्यक सेवा सुरू होत्या त्या सर्व सेवा तीन दिवस पुर्ण पणे बंद राहातील तसेच या काळात कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्यां वर कडक कारवाई करण्यात येईल याची खबरदारी घ्यावी तसेच शेतकऱ्यांनी ही भाजीपाला बाजारात आणु नये असे आवाहन करण्यात आले आहे, तरी नागरीकांनी परिस्थिती चे गांभीर्य ओळखून शासन व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.