केशरी शिधापत्रिका धारकांसाठी ग्राहक पंचायतीतर्फे तक्रार निवारण केंद्र सुरू

0

भुसावळ (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील केशरी रेशनकार्ड धारक परंतु राष्ट्रीय अन्न सुरक्षा यादीत नाव समाविष्ट नाही अशा ग्राहकांनाही स्वस्त धान्य दुकानातून धान्य देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. मात्र अनेक दुकानदार विविध कारणांनी लाभार्थींना धान्य देण्याचे नाकारत असून अश्या ग्राहकांना योग्य ती मदत करण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे तक्रार निवारणार्थ मदत केंद्र सुरू करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्र.ह.दलाल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

तक्रारीसाठी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन
लॉक डाऊनच्या काळात मे व जून ह्या महिन्यासाठी प्रति व्यक्ति नुसार गहु आणि तांदूळ कमी दराने केशरी कार्ड धारकांना देण्याची शासनाची योजना आहे परंतु काही दुकानदार धान्य देण्याचे नाकारत आहेत अश्या तक्रारी येत आहेत. याशिवाय धान्य कमी देणे, जास्त भाव लावणे, पावती न देणे अश्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी योग्य ती मदत व मार्गदर्शन करण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी मोबाईल क्रमांक 9765983531 ह्यावर संपर्क साधावा, असे आवाहन ग्राहक पंचायत जळगाव जिल्हा अध्यक्ष प्र.ह.दलाल यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.