पाचोऱ्यातील सिंधी काॅलनी परिसर केला सील

0

पाचोरा (प्रतिनीधी) :– बागवान मोहल्ल्यातील मृत ६५ वर्षीय वृध्दाचा वैद्यकिय अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर शहरातीलच शिंधी काॅलनी परीसरातील एका ६५ वर्षीय व्यापार्‍याचा राञी उशिरा वैद्यकिय अहवालही पाॅझिटिव आल्याने दि. ३० रोजी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधी काॅलनी परिसर बंद करण्यात आला. सिंधी काॅलनी भागालगत वरखेडी रोड व परिसर पञा व बॅरिकेट लावुन सिल केला आहे. रूग्णाच्या घरातील जोखिमवाले ६ व संपर्कातील १३ अशा १९ जणांना शहरातील सारोळा रोडवरील समर्थ लाॅन्स येथे काॅरेन्टाईन करण्यात आले आहे.

शहरात बागवान मोहल्ल्यातील रूग्णाच्या रिपोट नंतर प्रशासकीय यंञणेने शहरातील लाॅकडाऊन कडक करण्यात आले आहे. शहरातील सिंधी काॅलनी परिसरातील व्यापार्‍याला जळगाव येथे हलविण्यात आल्यानंतर त्यांचाही वैद्यकीय अहवाल हा पाॅझिटिव आल्याने दि. ३० रोजी सकाळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, पोलिस उपअधीक्षक ईश्र्वर कातकाडे, तहसिलदार कैलास चावडे, पोलिस निरिक्षक अनिल शिंदे, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, तालुका वैद्यकिय अधिकारी डाॅ. समाधान वाघ, पोलिस उपनिरिक्षक यांच्यासह वैद्यकिय पथक, पोलिस कर्मचारी व नगरपालिका कर्मचार्‍यांनी सिंधी काॅलनी परीसर बंद केला. यावेळी या भागाची नगरपालिकेने फवारणी केली तसेच तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांच्या पथकाने रूग्णाच्या कुटुंबातील ६ व्यक्ती व संपर्कातिल १३ असे १९ जण शहरातील सारोळा रोडवरील समर्थ लाॅन्स येथे काॅरेन्टाईन केले आहे.आरोग्य विभागाच्या टिम मधील २७ कर्मचारी रात्री पासूनच घरोघरी जाऊन नागरीकांची आरोग्य तपासणी करण्या कामी लागले आहेत.

शहरातील केळी विक्रेता व्यापारी व सिंधी कॉलनी येथील व्यापारी या दोघांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने संपूर्ण पाचोरा शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच दिवशी नगरपरीषदेच्या कर्मचाऱ्यांचा निमोनिया आजारावर उपचार सुरू असतांना जळगांव येथे मृत्यू झालाआहे. तसेच दि. २९ रोजी पहाटे ३:३० वाजता देशमुख वाडी भागातील चहा दुकान असलेल्या ३७ वर्षाच्या इसममाचा मृत्यू झाला आहे. त्याचा स्वॉब जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आला असल्याने पाचोरेकरांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.

पाचोरा मुख्याधिकारी शोभा बाविस्कर प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, कर अधिक्षक डी. एस. मराठे, अतिक्रमण अधिकारी साईराज जाधव, प्रभारी आरोग्य निरीक्षक मोरे, गोपाल लोहार, सचिन जगताप, अनिल टागोर, अमोल आहिरे, जयराम बजाज, अनिल मेघराज पाटील, भागवत पाटील, अनिल वाघ, महेंद्र गायकवाड, आकाश खैरनार, सुनिल पवार, नितिष चांगले, किरण घारू, अनिल बागुल, आकाश जावळे, बापु ब्राह्मणे, देविदास देहडे, राजू लहासे, मिलिंद टागोर, वाल्मिक गायकवाड, किशोर मराठे आदी नगरपालिका कर्मचारी परिश्रम घेतले बागवान मोहल्ला, देशमुखवाडी भागातील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल परिसर, बाहेरपुरा, सिंधी कॉलनी कॉलनीचा परिसर पूर्ण हायड्रो क्लोरीन ने स्वच्छ करून घेतला आहे.

सध्या शहरात दोन पाॅझिटिव रुग्ण आढळले असुन त्यापैकी एक मृत झाला आहे. दुसर्‍यावर उपचार सुरू आहे. तसेच दोन व्यक्ति मरण पावल्या असुन त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. पाॅझिटिव रूग्णांच्या घरातील १७ व्यक्तिंना जळगाव हलविण्यात आले आहे. तर शहरात ४२ जणांना काॅरेंटाईन करण्यात आले आहे. शहरासह तालूकावासियांनी घाबरून न जाता प्रशासनाला घरीच राहुन सहकार्य करा. बाहेरगावाहुन आलेल्यांची माहीती त्वरित जवळच्या प्रशासकिय यंञणेला द्या. लवकरच आपण सर्व मिळुन करोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखु आणि पुन्हा आपले शहर व तालुका करोनामुक्त होईल अशी आशा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांनी व्यक्त केली.

शहरासह तालूक्यात करोना आजारा व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार करण्यासाठी डाॅक्टरांनी आपली काळजी घेत दवाखाने उघडे ठेवावेत. जेणेकरून इतर आजारांवर जनसामान्यांना उपचार देता येईल. त्यांची धावपळ होणार नाही. तरी पाचोरा शहर व तालुक्यातील वैद्यकिय क्षेञात कार्य करणार्‍या डाॅक्टरांनी स्वतःची काळजी घेत वैद्यकिय सेवा देउन सहकार्य करावे असे अवाहन तालुका वैद्यकिय अधिकारी डाॅ.समाधान वाघ यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.