पारोळा येथे ठिबक दुकानवर कारवाई : दुकान केले सिल

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा येथील शेतकी संघ कॉम्प्लेक्समध्ये असलेले साई ठिबक या दुकानावर कारवाई करून दुकान सील करण्यात आले आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, या दुकानावर अमळनेर येथील ४४ वर्षीय इसम हा या दुकानात कामावर असल्याने तसेच अमळनेर हे कोरोना कोव्हीड १९चे हाॅटस्पाट आहे. तरीही तो रोज अमळनेर येथुन ये जा करीत असे तसेच या व्यक्ती ला दि, १७ च्या रात्री ८ वाजेच्या सुमारास रत्नापिंप्री येथील चेकपोस्ट वर अडवण्यात आले होते. तेव्हा त्याला ताकीद देऊन खबरदारी चा उपाय म्हणून उद्या पासुन पारोळा येथे येण्यास मनाई करण्यात आली होती तरीही ही व्यक्ती दि, १८ च्या रोजी अमळनेर येथुन छुप्या मार्गाने पारोळा येथील दुकानात कामावर हजर झाल्याचे पारोळा तहसीलदार अनिल गवांदे यांना कळल्यावर त्यांनी या दुकानास पथकासह भेट देत पाहाणी केली असता सदर व्यक्ति तेथे आढळून आल्याने कारवाई केली तसेच या दुकानातील दुकान मालकासह या व्यक्ती ला पारोळा कुटीर रूग्णालयात आणुन तपासणी करून यांना होम क्वाॅरंटाईन करण्यात आले.

यावेळी पारोळा तहसिलदार अनिल गवांदे, पारोळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ विजय कुमार मुंडे, पारोळा कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ, योगेश सांळुखे, डॉ गिरीश जोशी, शहर तलाठी निशिकांत पाटील, गौरव लांजेवार यांनी ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.