पारोळा येथील शिक्षकाने दिला व्हॉट्सअप इमेज द्वारे कोरोना बाबत संदेश

0

पारोळा | प्रतिनिधी

पारोळा शहराचे नागरिक व महाराष्ट्र शासन जिल्हा व राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक मनवंतराव साळुंखे हे विविध माध्यम व संकल्पना वापरुन सामाजिक प्रश्नाबाबत जागृती नेहमी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन करीत असतात .

सध्या कोरोना बाबत सोशल मिडीयावर येणारे विविध फोटो , संदेश व लांबलचक पोस्ट वाचुन युजर कंटाळले . यावर एक अभिनव ,आनंददायी व निरीक्षणातुन मुकपणे संदेश देण्याची नाविन्यपुर्ण व अभिनव युक्ती शोधुन त्यांनी पोस्ट केली . अनेक बांधवांनी लाईक करून इतरांना फारवर्ड ही करीत आहेत .

साळुंखे यांनी अक्षर व शब्दांचा वापर न करता व्हॉटस अप मध्ये असलेले इमोजी व खुणा वापरून कोरोना बाबत काय काळजी घ्यावी हा संदेश लोकांपर्यंत मुक पण प्रभावीपणे पोहचविला आहे .

मास्क वापरणे बरोबर, हात मिळविणे चुकीचे, थंड पदार्थ खाणे चुकीचे, वेळोवेळी हात धुणे बरोबर, बाहेर गर्दी करून खेळणे चुकीचे , घरातच परिवारासोबत राहणे बरोबर , रुमाल न वापरता शिंकणे चुकीचे, डोळयांना बोटांनी चोळणे चुकीचे, उगीच घराबाहेर पाऊल टाकणे चुकीचे, अती थंड पेय पिणे चुकीचे,नाकाला व तोंडाला परत परत हात लावणे चुकीचे ,सुर्यप्रकाशाचा लाभ घेणे बरोबर, आईसक्रिम सारखे थंड पदार्थ खाणे चुकीचे व लॉक डाऊन पाळावे . असा प्रभावी संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकाचा विषय ठरला आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.