पारोळा मंगरूळ मार्गे कसोदा रस्ताचे वाजले तीन तेरा

0

पारोळा (प्रतिनिधी) :  पारोळा ते मंगरूळ मार्गे कसोदा रस्त्या  चे तीन तेरा वाजले  आहेत.पारोळा ते कसोदा 20 किमी अंतर असुन संपुर्ण रस्त्याची दयनीय अवस्था झाली असुन रस्त्याला मोठ मोठे खडे पडले असुन रोज लहान मोठे अपघात होत असुन अपघाताना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.मागिल वर्षी प्रशासन कडून डागडूजी करण्यात आली होती पण ती अती निकृष्ट दर्जाचे काम करुन भोंगळ कारभार करुन शासनाची फसवणूक करण्यात आली आहे.मागिल वर्षी 2018 मधे मे महिन्यात रस्त्या चे काम करण्यात आले होते पण एका पावसाळ्यात जवळपास सर्व रस्त्यांची वाट लागली आहे. रोज हजारो वाहन ये जा करतात या मध्ये मोठ मोठी खड्यां मधुन  वाहनाची वाट काढत चालकाची नाके नऊ येतात. खराब रस्त्या मुळे एसटी बस च्या फेर्या पण कमी करण्यात आल्या आहेत तालुक्यात सा.बा.विभाग नावाचा एक प्रशासकीय विभाग आहे.की नाही असा प्रश्न मोरफळ,मंगरूळ,धुळपिंप्रि,

मालखेडा येथील नागरीकांना पडला आहे. तसेच हे जे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे.याची चौकशी करावी सबंधीत ठेकेदारा वर कठोर चौकशी करुन दंडात्मक कारवाई करावी अशीही मागणी ग्रामस्थ करित आहे.तरी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रशासन कुणाचा जीव जाण्याची वाट पहात आहे का असा प्रश्न पडतो आहे.जर सा.बा.विभागाने येत्या दोन दिवसांत जर रस्त्याच्या कामाची सुरुवात केली नाही तर मोरफळ,मंगरूळ,धुळपिम्प्री, मालखेडा येथील सर्व ग्रामस्थ रास्ता रोको करु असा इशारा देण्यात आला आहे.अशी माहिती पंचक्रोशीतिल पद सिध्द नागरिक श्री मधुकर पाटील रा.धुळपिम्प्री उप सभापती कु.ऊ.बाजार समिती पारोळा ,  दिलीप पाटील रा.मंगरूळ उपसरपंच,सयाजीराव पाटील रा.मोरफळ मा.सरपंच यांनी सांगितले आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.