पारोळा बाजार समितीकडून १०० बेडचे कोविड सेंटर

0

पारोळा (प्रतिनिधी) : सध्या देशासह राज्यात कोरोना ने हाहाकार मजवला असुन या कोरोना च्या दुसर्या लाटे मुळे सध्या राज्यात मृत्यु चे प्रमाण ही वाढले आहे,म्हणुन आहेत त्या आरोग्य सुविधा अपुर्ण पळत असल्याचे चित्र सर्वदुर दिसत आहे,दिवसा गणिक कोरोना चे रूग्ण जिकडे तिकडे वाढत असल्याने आहेत त्या सुविद्या ह्या आता कमी पडु लागल्या आहेत,पारोळा येथिल कुटीर रूग्णालयात बेड च्या कमतरते मुळे अनेक रूग्णाची गैर सोय होत आहे,त्यामुळे रूग्ण व त्यांचे नातेवाईक बेड साठी इकडे तिकडे धावा धाव करित आहेत,नाईलाजास्तव त्यांना खाजगी रुग्णालया कडे जावे लागत आहे,या खाजगी रुग्णालयात रुग्णांची आर्थिक पिळवणुक होत असल्याचे निर्देशनास येत आहे.

म्हणुन पारोळा कृषि उत्पन्न बाजार समिती च्या वतीने स्वखर्चाने पारोळा येथिल हरिनाथ मंगल कार्यलय येथे १०० बेड चे कोविड सेंटर उभारण्याचा मानस बाजार समिती चे अध्यक्ष अमोल चिमणराव पाटील यांनी व्यक्त केला.

यात २५ आॅक्सिजन बेड तर ७५ नान आॅक्सिजन बेड ची निर्मती साठी बाजार समितीच्या वतीने जळगाव जिल्हा अधिकारी,जिल्हा शल्यचिकित्सक तसेच पारोळा एरंडोल चे आमदार चिमणराव पाटील यांच्या कडे बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांनी पत्र पाठवुन परवानगी मागितली आहे,तसेच या कोविड सेंटर ला पारोळा कुटीर रुग्णालयाशी सलग्न ठेऊन शासकिय यंत्रेचे डाॅक्टर वैद्यकिय सेवेचे कर्मचारी यांची सेवा शासना मार्फत पुरविण्यात यावी,अशी मागणी या पत्रा द्वारे करण्यात आली आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.