वरणगांव नवीन बायपासवर कठोरा क्रॉसिंगवर जंक्शन करा ; आ.सावकारे यांच्याकडे मागणी

0

वरणगाव :  वरणगांव बायपास वर कठोरा गावाकडून आयुध निर्माणी व  वरणगाव शहरातून नवीन बायपास वर चढण्यासाठी व उतरण्यासाठी कठोरा रस्त्याच्या क्रॉसिंग वर एक जंक्शन देण्यात यावे तसेच फुलगाव जवळील रेल्वे गेट आता बंद होणार असल्याने लांब पल्ल्याच्या बसेस तसेच जास्त क्षमातेच्या गाड्या ह्या वरणगाव शहरात येऊ शकणार नाही त्याकरिता आता जश्या परिस्थितीत सुरू आहे तसेच सुरू ठेवण्यात यावे तसेच नवीन बायपास झाल्याने वरणगांव शहरातुन फुलगाव फाटा बस स्थानक चौक ते साईबाबा मंदिर दरम्यान समांतर महामार्गाचे दुभाजक व लाईट टाकुन सर्कलचे काम सुरू करण्यात यावे अशी पुनर्रमागणी आज भाजपाच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी,खासदार रक्षाताई खडसे,भुसावळचे आमदार श्री.संजयजी सावकारे,प्रकल्प संचालक श्री.सिन्हा, प्रांतधिकारी श्री.रामसिंग सुलाने यांच्याकडे माजी नगराध्यक्ष सुनिल काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी,उनगराध्यक्ष शेख आखलाक,नगरसेविका सौ.मालाताई मेंढे,मेहनाजबी इरफान पिंजारी,भाजपा सरचिटणीस गोलू राणे,कुंदन माळी,उपाध्यक्ष हितेश चौधरी, युसुफखान,नाटराज चौधरी,भाजयुमो अध्यक्ष संदीप भोई,उपाध्यक्ष लखन माळी,पप्पू ठाकरे,सरचिटणीस  आकाश निमकर,तेजस जैन, महिला मोर्चा अध्यक्ष सौ.प्रणिता पाटील चौधरी,  मिलिंद भैसे यांनी केली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.