पारोळा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्याग्रह दिवस साजरा

0

पारोळा (प्रतिनिधी) : आज शनिवार रोजी अखंड भारताचे पुरस्कर्ते, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. व भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची  पुण्यतिथी निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

तसेच हा दिवस किसान अधिकार दिवस म्हणून पाळण्यात आला. केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी हिताच्या विरोधात तीन काळे कायदे विधेयक पास केले असून ते कायदे जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत काँग्रेस कमिटीतर्फे शेतकरी सह्यांची ची मोहीम राबवली जात असून त्याच्याच भाग म्हणून आजचा दिवस किसान अधिकार दिवस म्हणून व सत्याग्रह दिवस म्हणून पाळण्यात आला. तसेच पारोळा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘किसान अधिकार दिवस’ म्हणून ठराव मंजूर करण्यात आला. प्रथम सरदार वल्लभाई पटेल व स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेला तालुका अध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान यांनी पुष्पहार अर्पण केला.

यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद बाबुराव पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब हिलाल पाटील, नामदेव भिका महाजन, अपंग सेलचे अध्यक्ष सुरेश भोई, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष बेलदार विजय भोई, अमोल भोई, संजय शितोळे, मुरलीधर परभत पाटील, अनिल अनुष्ठान, हिमांशू का विरे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.