पारोळा ट्रामा केअर सेंटर मध्ये ५० बेड चा आयोसोलेटेड तयार

0
पारोळा–प्रतिनिधी
मागील अनेक वर्षांपासून पारोळा येथे ट्रॉमा केअर साठी बिल्डिंग तैयार असुन काही कारणास्तव हे ट्रॉमा केअर सेंटर सुरू झालेले नाही, म्हणून याच बिल्डिंग चा वापर आज कोरोना वायरस शी मुकाबला करण्यासाठी व शहरातील काही प्रमुख दवाखाने बंद असल्याने कुटीर रूग्णालयाची जागा अपुर्ण पडत असल्याने ही या जागेचा वापर करण्यात येईल का म्हणून पारोळा तहसीलदार अनिल गवांदे, यांनी काही अधिकार्यांची बैठक बोलावली यात पारोळा कुटीर रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ, योगेश सांळुखे, डॉ, चेतन करोडपती, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ, प्रांजली पाटील, तसेच पारोळा नगरपालिके चे मुख्याधिकारी डॉ विजय कुमार मुंडे, याच्या उपस्थित ही बैठक पार पाडली यात सध्यस्थितीत जागा अपुर्ण पडत असल्याने या ट्रॉमा केअर सेंटर च्या इमारती ला स्वच्छ करून यात ५० बेड चे आयोसोलेटेड कक्ष निर्मिती करण्याचे सुचित केले, तसेच लगेचच नगरपालिके च्या आरोग्य विभागाचे कर्मचार्यांनी सदर परिसरात व इमारतीला स्वच्छ करून फवारणी करून व निर्जंतुकीकरण करून सदर इमारत स्वच्छ केली, या प्रसंगी नगरपालिके चे मुख्याधिकारी डॉ विजय कुमार मुंडे, आरोग्य सभापती दिपक अनुष्ठान, कैलास पाटील, यानी स्वता लक्ष घालून सदर परिसर व इमारत सुसज्ज करून घेतले, दि, २६ रोजी शहरातील काही खाजगी दवाखाने बंद असल्याने नागरिकांनी कुटीर रूग्णालयात धाव घेतली या वेळी सोशल डिस्टंस ठेवत आलेल्या जवळ पास ७०० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली, अशी माहिती पारोळा कुटीर रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी योगेश सांळुखे,यांनी दिली, डॉ, चेतन बडगुजर, डॉ गिरीश जोशी, डॉ, सुनिल पारोचे, व कुटीर रूग्णालयातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले,

Leave A Reply

Your email address will not be published.