पाच हजार रॅपिड अँटीजेन टेस्टिंग किट जामनेर तालुक्यासाठी उपलब्ध करून देणार ; आ. गिरीश महाजन

0

जामनेर (प्रतिनीधी):- पळसखेडा येथील प्रकाशचंद जैन महाविद्यालयांमध्ये सुरू असलेले 50 आणि आज 140 बेड असलेल्या कोविंड सेंटरचे उद्घाटन माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

त्याप्रसंगी 25 लाख रुपये किमतीचे पाच हजार रॅपिड अँटीजेन टेस्ट किट माझ्या फंडातून उपलब्ध करून देणार आहे. अशी माहिती आमदार गिरीश महाजन यांनी दिली. तसेच पहूर येथे ऑक्सिजन असलेले 30 व जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे 50 बेड रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्वात जास्त ऑक्सिजन असलेले बेड मध्ये जामनेर तालुका हा पहिला आहे असेही महाजन म्हणाले या ऑक्सिजन बेडसाठी सुप्रीम कंपनीची आर्थिक मदत झालेली आहे तसेच पळसखेडा सेंटरसाठी कावडीया बंधूंची सुद्धा मदत झालेली आहे आणि म्हणून आता जामनेर तालुक्यातील कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन साठी जळगाव जाण्याची गरज भासणार नाही. अशी व्यवस्था आपण जामनेर मध्ये केलेली आहे. सदर उद्घाटनप्रसंगी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार अरुण शेवाळे, नोडल अधिकारी डॉ. विनय सोनवणे, डॉ. आर के पाटील ,डॉ. हर्षल चांदा, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील व आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.