पाचोऱ्यात शिवसेनेचे रास्तारोको आंदोलन ऐवजी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

0

पाचोरा (प्रतिनिधी) :  पाचोरा – भडगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कापूस,मका, सोयाबीन, ज्वारी बाजरी, या पिकांचे १०० नुकसान झाले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राज्यपालांनी नुकसान भरपाई म्हणून कोरडवाहू पिकासाठी हेक्टरी ८००० हजार व फळबागांसाठी १८ हजार रुपये नुकसानभरपाई मंजूर करून शेतकऱ्यांची कुचेष्टा केली आहे. या अनुभवातून पिकांसाठी झालेला खर्चही निघणार नसल्याने राज्यपाल महोदयांनी कोरडवाहू पिकासाठी २५ हजार व बागायत पिकांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, शेतकऱ्यांचा ७/१२ उतारा कोरा करावा, संपूर्ण विज बिल माफ करावे, विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफ करुन बसेसच्या पासेस मोफत द्याव्या या मागण्यांसाठी शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, शहर प्रमूख किशोर बारावकर, ज्ञानेश्वर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जारगाव चौफुलीवर सकाळी ११ वाजता रास्तारोको आंदोलन करण्याचे आयोजन केले होते. आंदोलनाद्वारे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे, पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय नलावडे यांचे सह सकाळी १०:३० वाजेपासुन जारगांव चौफुलीवर पोलिसांचा मोठा ताफा लावण्यात आला होता. मात्र १२ वाजेच्या दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडुन पोलिस निरीक्षकांना रास्तारोको आंदोलन करण्याचे रद्द झाल्याने आम्ही मोर्चा काढुन निवेदन देत आहेत.असे समजल्याने अखेर रास्तारोको रद्द करण्याचे कारण गुलदस्त्यात राहिले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील शिवसेना कार्यालयाजवळुन शिवसैनिकांनी मोर्चा काढला. मोर्चात जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, शेतकरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अरुण पाटील, जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमूख अविनाश कुडे, तालुका प्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, ज्ञानेश्वर चौधरी, बाजार समितीचे माजी सभापती अॅड दिनकर देवरे, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख रमेश बाफना, नगरसेवक बापु हटकर, आमदार किशोर पाटील यांचे स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील, अंबादास सोमवंशी, डॉ. शेखर पाटील, शरद तावडे, एस.टी. सावळे, बाजार समितीचे माजी संचालक शिवदास पाटील, वसंत वाघ, कैलास पांडे, खंडु सोनवणे, जितेंद्र पेंढारकर, वैभव राजपुत, अनिकेत सुर्यवंशी, पप्पु पाटील, नितीन पाटील, सुमित सावंत, मधुकर बारी, पप्पु जाधव, योगेश पाढरवट, संतोष हटकर यांनी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी माध्यमांशी बोलतांना अमोल शिंदे यांनी आमदारांवर परवा केलेला आरोप खोडुन काढत आमदार किशोर पाटील हेच खरे शेतकऱ्यांचे कैवारी असुन त्यांनी शेतकऱ्यांच्या बांदावर जावुन परिस्थिती पाहिली आहे. मात्र भाजप वाल्यांच्या सत्तेच्या लालसे पोटी सरकार स्थापन न होता. राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सरकार स्थापन होताच शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिल.

Leave A Reply

Your email address will not be published.