बालकांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी कुटुंब संस्था जपणे आवश्यक! डॉ. उमेश वाणी

0

आज 20 नाव्हेंबर जागतिक बाल हक्क दिन
भारतीय संस्कृतीरूढी परंपरा आणि पिढीजात पारतंत्र्यात गुरफटलेल्या भारतीयांसाठी बालकांचे हक्क ही संकल्पनाच मुळी चकीत करणारी आहे. मुलांनी लहानपणापासून कष्ट केले पाहिजेत त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे हा संस्कार भारतीयांमध्ये रूजला आहे. भारतीयांमध्ये बालहक्कांची संकल्पना रूजविणेफुलविणे हे तितकेच अवघड काम आहे. दारिद्र्यअज्ञानपरंपरागत चालीरिती यांनी जखडलेल्या समाजातील मुलेनैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींना तोंड देत असलेली मुले जगभरात करोडोंच्या संख्येने आहेत. त्यांना विकासाची कोणतीही संधी उपलब्ध नाही. आईवडीलांपाठोपाठ ही मुले देखील या व्यवस्थेच्या चरख्यांमध्ये गुरफटतच जातात. कित्येक मुले बालपणीच दगावतात. करोडो मुले इच्छा असूनही शाळेत जाऊ शकत नाहीत. कित्येक मुले दुधाचे दात पडण्याआधीच कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांच्या वयालाशरीराला न पेलावणा­या कामाला जुंपली जातात. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र परिषदेने बालकांच्या मुलभूत हक्कांची संहिता तयार केली. ही संहिता जगातील बहुसंख्य राष्ट्रांनी 20 नोव्हेंबर 1989 रोजी मंजूर केली म्हणून 20 नोव्हेंबर हा दिवस जागतिक बाल हक्क दिवस म्हणून बालकांविषयी जागृती निर्माण करण्यात येते. ऑगस्ट 1992 मध्ये भारत सरकारने या संहितेला मंजूरी दिली. हेच जगभरातील बालकांचे हक्क आहेत. या संहितेत बालकांच्या हक्कांची एकूण 41 कलमे आहेत.

      संयुक्त राष्ट्र परिषदेच्या मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामध्ये विशेष काळजी घेतली जाणे आणि योग्य मदत मिळणे हे बालपणीचे हक्क आहेत. या जबाबदा­या कुटुंबच पुरे क डिग्री शकते म्हणून कुटुंबसंस्था जपणे गरजेचे आहे. शांततामानमान्यतासहिष्णुताप्रेमआदरसहकारस्वातंत्र्यसमता व एकता या मुल्यांनी भरलेल्या वातावरणात मुले वाढली पाहिजेत. बालकांच्या हक्कांच्या संहितेत असे स्पष्ट करण्यात आले आहे कीप्रत्येक मुलाला जगण्याचा मुलभूत हक्क आहे. हे सर्व राष्ट्रांना मान्य असून सर्व राष्ट्रेमुले जगतील व त्यांचा विकास होईल याची काळजी घेतील. मुलांचे पालन-पोषण व विकासाची जबाबदारी मुलांच्या आई-वडिलांना पार पाडता यावी व मुलांना त्यांचे हक्क उपयोगात यावेत म्हणून सर्व राष्ट्रे आई वडिलांना व पालकांना याबाबतीत मदत करतील. शिवाय मुलांकरिता असलेल्या सेवासुविधा व संस्था यांचा विकास करतील.

बालकांचे हक्क :

1)   जगण्याचा अधिकार : जीवनआरोग्यपौष्टीक अन्न मिळण्याचास्वत:च्या नावाचाराष्ट्रीयत्वाचा.

2)   विकासाचा अधिकार : शिक्षणकाळजी घेण्याचाफुरसतीच्या वेळेचा अधिकारमनोरंजनाचा अधिकार.

3)   संरक्षणाचा अधिकार :  व्यक्त करण्याचामाहिती मिळविण्याचाविचार मांडण्याचाधर्माचा.

      राष्ट्रसंघाच्या 191 देशांच्या सदस्यांनी 2015 पर्यंत जागतिक व राष्ट्रीय स्तरावर पुढील आठ ध्येय साध्य करण्याचे ठरविले आहे.

1)    दारिद्र्य आणि उपासमारीचे शेवटपर्यंत निर्मुलन करणे.

2)   मुलामुलींसाठी जागतिक स्तरावर प्राथमिक शिक्षण साध्य करणे.

3)   लैंगिक समानतेला आणि स्त्री सबलीकरणास प्रोत्साहन देणे.

4)   बाल मृत्यूचे प्रमाण कमी करणे.

5)   प्रसुती काळातील आरोग्य सुधारणे.

6)   एच.आय.व्ही./ एड्समलेरिया आणि इतर रोगांचे निराकरण करणे.

7)   पर्यावरण सातत्यपूर्वक सुरक्षित ठेवणे.

8)   विकासासाठी जागतिक सहभागित्व विकसीत करणे.

      महाराष्ट्र सरकारच्या माहिला व बालकल्याण विभागानेही बालकांच्या विकासाविषयी धोरण 2002 मध्ये निश्चित केले आहे. यात

1)   आरोग्य : जन्मपूर्व आणि जन्मानंतर काळजी घेणेजन्म नोंदणी करणे, 0 ते 6 वयोगटातील मुलांचे बालमृत्यू कमी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा वाढविणेअंगणवाडी केंद्रातून लहान मुलांना सुविधा पुरविणेफिरत्या आरोग्य केंद्राची सुविधा करणेमुलांच्या काळजी व मार्गदर्शन केंद्रावर मुलांसाठी सकारात्मक वातावरण तयार करणेएच.आय.व्ही. आणि एड्स बाधीत मुलांचे रक्त तपासणीसाठी सुविधा उपलब्ध करणे.

2)   शिक्षण आणि मनोरंजन :  अंगणवाडी आणि बालवाडी सारख्या शाळा पूर्व शिक्षणाकडे मुलांना आकर्षित करणे,  बालन्याय अधिनियम (काळजी व संरक्षण) 2000 अंतर्गत मुलांना प्रशिक्षण देणेमनोरंजन केंद्रक्लब इ. च्या माध्यमातून स्विमींगबॅडमिंटनग्रंथालय इ. सुविधा अल्प दरात उपलब्ध करणे.

3)   कौटुंबिक वातावरण : दत्तक जाणा­या मुलांकडे समाजाचा दृष्टिकोन बदलविणेकुटुंबासाठी मुले नव्हे तर मुलांसाठी कुटुंब अशी संकल्पना रूजविणेमुलांना त्यांचे घर अथवा संस्था मिळवून देणेत्यांना नाव देणेबालिका समृद्धी योजना आणि किशोरी शक्ती योजना प्रभावीपणे राबविणे.

4) संरक्षण देणे :  मुलांचे लैंगिक शोषण आणि अमानवीय वाहतुक थांबविणेमुलांचे लैंगिक शोषण टाळण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेणे. चाईल्ड लाईन सारखे उपक्रम राबविणेबालविवाह टाळणेबाल कामगारांसाठी विकासात्मक योजना राबविणेहरविलेल्या मुलांचा शोध घेणेसापडलेल्या मुलांसाठी घर मिळवून देणेबाल गुन्हेगारांना पुन्हा सामाजिक प्रवाहात आणणेशारीरिक आणि मानसिक आव्हानांना सामोरे जाणा­या मुलांना स्वयंसेवी संस्थांद्वारे मदत करणे.

5) सहकार्य : ग्रस्तत्रस्त आणि विविध आव्हानांना सामोरे जावे लागणा­या मुलांना भिक्षेकरी मुलेस्थलांतरीतएच.आय.व्ही बाधीतबाल वेश्यावृत्तीबालगुन्हेगारबालकामगार इ. ना सहकार्य करणे. हिला आणि बाल कल्याण विभागामार्फत बालहक्काविषयी स्वतंत्र कक्ष चालविणेबाल हक्कांविषयी जाणी जागृती आणि संवेदनशिलता निर्माण करणे इ.

संदर्भ : महाराष्ट्र शासन – महिला व बालकल्याण धोरण 2000

 

डॉ. उमेश वाणी

सहयोगी प्राध्यापकलोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय,

जळगाव (मो. 9422279951)

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.