पाचोरा येथे पोलिस प्रशासनास मास्क व सॅनिटाझर तर ग्रामिण रुग्णालयात राष्ट्रवादीतर्फे फळ वाटप

0

पाचोरा (प्रतिनीधी) : येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्षा सरला पाटील यांच्या नैतृत्वात पोलिस स्टेशन येथे पोलिस कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझयर व खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात आले तसेच ग्रामीण रुग्णालयातील कोविड वॉर्ड मधील रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.

यावेळी पाचोरा नगरपालिका गटनेते व नगरसेवक संजय वाघ, नगरसेविका सुचेता दिलीप वाघ, विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन  तावडे, पाचोरा तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक विकास पाटील, पाचोरा शहराध्यक्ष अझहर  खान, बाजार समिती प्रशासक रणजित पाटील, वैशु जडे, सुनिता देवरे, निलेश पाटील, प्रशांत पाटील, गौरव शिरसाठ, हेमंत पाटील, गणेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पोलिस प्रशासनाकडुन पोलिस निरिक्षक किसन नजनपाटील व ग्रामिण रूग्णालय प्रशासनाकडुन वैद्यकीय अधिकारी डाॅ. अमित साळुंखे यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.