भुसावळ नजिक राष्ट्रीय महामार्गावर डंपरची दुचाकीला धडक; दोघे सख्खे भाऊ ठार

0

भुसावळ प्रतिनिधी- शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी असलेल्या दोघा भावंडांचा भरधाव डंपरच्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात महामार्गावरील ट्रॅक्टर शोरूमजवळ गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास झाला. दोघा भावंडांच्या अपघाती मृत्यूमुळे सिंधी कॉलनीत शोककळा पसरली.

शहरातील सिंधी कॉलनी येथील जुन्या प्रायमरी स्कूलजवळील रहिवासी मनीष दर्डा (३०) आणि रितेश दर्डा (२६) हे जळगावकडून भुसावळकडे मोटरसायकलने येत असताना ट्रॅक्टर शोरूमजवळ डंपर (जी.जे.१२ वाय ८१०६) ने धडक दिली.

अपघाताचे वृत्त समजताच सिंधी कॉलनीमधील सिंधी बांधवांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मनीष आणि रीतेश हे दोन्ही बंधू जळगाव येथे व्यवसाय करतात. तेथून ते भुसावळ येथे येत असतांना हा अपघात घडला. अपघाताचे वृत्त समजताच तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार व सहकार्याने धाव घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.