पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये १६ डाॅक्टर्स देणार दिवस – रात्रभर सेवा*

0
पाचोरा ️ प्रतिनिधी
पाचोऱ्यातील विघ्नहर्ता हाॅस्पिटलमध्ये डॉ. भुषण मगर, डॉ. सागर गरुड सह सर्व टीम कोविड सेंटर मध्ये सक्रिय होतेच पण आता खाजगी डॉक्टरांनी देखील सेवा देण्याचे धाडस दाखविले आहे.
     शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात दि. १३ मार्च पासूनच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केलेला आहे. यातील तरतुदींची कडक अंमलबजावणी साठी विविध उपाययोजना सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून पाचोऱ्यातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी शासनाने अधिग्रहीत केलेले देशमुखवाडी भागातील विघ्नहर्ता हॉस्पिटल  येथे पाचोऱ्यातील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शासनाकडील तोकडे मनुष्यबळ  कमी पडत असल्याने स्थानिक प्रशासनाने पाचोऱ्यातील खाजगी डॉक्टरांच्या सेवा देखील अधिग्रहित केल्या आहेत. तहसीलदार तथा कमांडन्ट ऑफिसर यांनी खालील प्रमाणे आठवड्यातील वार निहाय खाजगी डॉक्टर्स यांना कोविड केअर सेन्टर येथे सेवा देण्याबाबत निर्देशित केले आहे. त्यानुसार डॉ.अनुप अग्रवाल यांनी नेमून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आपली सेवा बजावली आहे. पाचोऱ्यातील खाजगी डॉक्टर्स मंडळींच्या या सेवा कार्याबद्दल जनतेतुन आनंद व्यक्त होत आहे. तर अनेक डॉक्टरांनी या अडचणीच्या काळात आम्ही रुग्णसेवा देत या सेवा कार्यात खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाल्याने आनंद होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. दिवसाला प्रत्येकी दोन डॉक्टर आठ तास या प्रमाणे शहरातील १६ डॉक्टर्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी आठ ते रात्री आठ व पुन्हा रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत सेवेची वेळ असणार आहे.
     *आठवड्यातील वारनिहाय खाजगी डॉक्टरांचे सेवा वार पुढील प्रमाणे आहेत*
*सोमवार* – डॉ.अजय परदेशी, डॉ. चारुदत्त खानोरे
*मंगळवार* – डॉ.अनुप अग्रवाल, डॉ.अतुल महाजन
*बुधवार* -डॉ. निलकंठ पाटील, डॉ.मुकुंद सावनेरकर
*गुरूवार*- डॉ.नितीन पाटील, डॉ. प्रशांत तेली
*शुक्रवार* – डॉ.प्रवीण देशमुख,
डॉ. सागर गरुड
 *शनिवार* – डॉ.संकेत विसपुते, डॉ. सुनील पाटील
*रविवार*- डॉ.स्वप्नील पाटील, डॉ. विकास केजरीवाल
*अतिरिक्त* – डॉ. विशाल पाटील, डॉ. यशवंत पाटील  याप्रमाणे वरिल सर्व डाॅक्टर्स सेवा देणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.