पाचोरा पिपल्स बॅंकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ३२ उमेदवार रिंगणात

0
– ८८ पैकी ५६ उमेदवारांनी घेतली माघार
– दोन पॅनल मध्ये होणार सरळ लढत
पाचोरा  प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील चार तालुक्यात विस्तार असलेल्या दि पाचोरा पिपल्स बँकेच्या माघारीच्या अखेरच्या दिवशी ८८ पैकी ५६ उमेदवारांनी माघार घेतली असून १५ जागांसाठी एकूण ३२ उमेदवार रिंगणात आहेत. यात सर्वसाधारण गटात पॅनल उमेदवारां शिवाय अनिल येवले व विलास अहिरे या २  अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली असून उर्वरित जागांसाठी सरळ लढत होणार आहे. माजी चेअरमन अशोक संघवी यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या पॅनल मध्ये सर्वसाधारण मतदार संघाच्या १० जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात असून माजी चेअरमन अशोक संघवी यांच्या नेतृवातील पॅनल मध्ये अशोक संघवी यांचेसह चंद्रकांत लोढाया, अल्पेश संघवी, सुभाष राका, सुशील मराठे, डॉ.जाकीर देशमुख, चंद्रकांत येवले, किशोर संचेती, शरद पाटील, सुरेंद्र बाफना हे तर अतुल संघवी यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या पॅनल मध्ये अतुल संघवी यांच्यासह प्रशांत अग्रवाल, जीवन जैन, देवेन कोटेचा, पवन अग्रवाल, अनिल बोरा, शरद पाटे, स्वप्नील पाटील, प्रकाश पाटील यांच्यात लढत होणार आहे .
 इतर मागास प्रवर्ग मतदार संघाच्या १ जागेसाठी सुभाष नावरकर, व भागवत महालपुरे यांच्यात सरळ लढत होणार असून महिला राखीव मतदार संघाच्या २ जागांसाठी तारा देवरे, विद्याबाई पाटील, डॉ. अस्मिता पाटील, मयुरी मुकुंद बिल्दीकर यांच्यात लढत होत आहे. अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून प्रवीण ब्राह्मणे व अॅड. अविनाश भालेराव यांच्यात सरळ लढत होत आहे. तर भटक्या विमुक्त जाती मतदार संघातून राजेंद्र राठोड व विकास वाघ यांच्यात लढत होत आहे. दि. ३१ रोजी माघार घेतलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये सतीश शिंदे, डॉ. जयवंत पाटील, राजेंद्र भोसले, गोविंद अग्रवाल, अॅड. अंकुश कटारे यांच्या नावाचा समावेश असून येत्या १२ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.