येत्या शनिवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ दीक्षांत समारंभ

0

जळगाव दि – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २८ वा दीक्षांत समारंभ येत्या शनिवार दि ४ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात संपन्न होत असून, त्यांची तयारी पूर्ण झाली आहे. या दीक्षांत समारंभासाठी माजी व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख वस्तू व्युत्पन्न व्यापार, सिटी बँक, अमेरिका येथील सुनील देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुळचे सांगली येथील रहिवासी असलेले सुनील देशमुख हे गेली ४० वर्ष अमेरिकेत राहत आहेत. वॉल स्ट्रीटवर त्यांनी कमोडिटी ट्रेडिंग मध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक प्राप्त केलेला आहे. महाराष्ट्रातील सामाजिक व साहित्य क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना महाराष्ट्र फौडेशनच्या माध्यमातून दरवर्षी पुरस्कार दिले जातात. तसेच

देशमुख यांनी महाराष्ट्र फौडेशनला १९९० मध्ये दोन कोटी रुपये देऊन ही पुरस्कार योजना सुरु केली होती. ते या  दीक्षांत समारंभात पदवीधरांशी संवाद साधणार आहे. पदवीप्रदान समारंभात ३८ हजार २८२ विद्यार्थी पदव्या बहाल करण्यात येणार आहेत. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे १६ हजार ३३९ विद्यार्थी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ६ हजार ५०३ विद्यार्थी, मानव्य विद्याशाखेचे १४ हजार ३३३ आणि आंतर विद्याशाखेचे १ हजार १०७ विद्यार्थ्याचा समावेश आहे. या शिवाय स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे बी.टेकचे ४५८ आणि एम.टेक. चे ५ अशी एकण ४६3 विद्यार्थ्यांना देखील पदवी बहाल केली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.