पहूर येथे ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

0

पहूर, ता.जामनेर (वार्ताहर) : – येथे जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डी.एस.पाटोडे यांच्या आदेशान्वये  कोरोना तपासणी चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात जिल्ह्यातील सर्वाधिक २४८ जणांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पहूर येथील महात्मा जोतीबा फुले मंगल कार्यालयात सदर शिबीर आयोजित  करण्यात आले . आज दि २१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . राजेश सोनवणे , पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ . हर्षल चांदा यांचे मार्गदर्शन लाभले . या प्रसंगी प्रारंभी खाजगी डॉक्टरांना डॉ. संदीप पाटील व डॉ जितेंद्र वानखेडे यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात आले. त्यांनंतर खाजगी डॉक्टर  जितेंद्र घोंगडे यांच्यासह आरोग्य सेवक बी.बी.काटकर व आरोग्य सेवक राजु मोरे यांनी स्वॅब तपासणी केली.
यावेळी
पहूर पेठ – १३
पहूर कसबे -१०
पाळधी – २
सोनाळा -१
भराडी – १
चिलगांव -१
पळसखेडा (मो ) -१
हिवरी -१
बोराडखेडा -१
असे एकूण ३१ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

यावेळी जिल्हा परिषद  सदस्य अमित देशमुख,माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे, पहूर पेठ सरपंच नीता पाटील, कसबे च्या सरपंच ज्योती घोंगडे, रामेश्वर पाटील, शंकर घोंगडे ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील, जितेंद्र वानखेडे, डॉ.जितेंद्र जाधव,प्रयोगशाळा अधिकारी सुनील चौधरी, लातीत केवट, देवेंद्र घोंगडे, अशोक सुरळकर,राजेंद्र वाणी,उदय चव्हाण, बबन पवार, आर.बी.पाटील,रोहिदास पाटील,गटप्रवर्तक माधुरी पाटील,यमुना चौधरी,सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. शिबिरामध्ये एकूण  २४८ रॅपिड टेस्ट   करण्यात आल्या . या रॅपिड टेस्ट पैकी ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.
यावेळी सलग दुसऱ्यांदा तपासणी केली असता स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह  आल्याबद्दल बाबुराव घोंगडे यांचा वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ . संदीप पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.

यावेळी डॉ . जितेंद्र जाधव, आरोग्य पर्यवेक्षक अशोक सुरडकर, ज्येष्ठ पत्रकार शरद बेलपत्रे, माळी समाज अध्यक्ष ज्ञानेश्वर करवंदे, आरोग्य सेवक आर .बी. पाटील, अतिष लोहार यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.