पारोळा येथे मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा तालुक्यात दिवसें दिवस कोरोना कोव्हीड च्या रूगण संख्येत वाढ होत आहे,तरीही काही लोकाना याचे गांभिर्य नाही, व ते शासनाच्या सुचनान कडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे. तोंडाला मास्क न लावणे सोशल डिसंटन्ट न पाळणे आश्या अनेक बांबीने कडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे,अश्या उपद्रवींवर जळगांव जिल्हाधिकार्याचा सुचने वरून कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पारोळा पोलिस निरिक्षक लिलाधर कानडे यांनी दिली यात पहिल्याच दिवशी कजगांव चौफुली व पारोळा पोलिस स्टेशन समोर ४० मोटर सायकल स्वारांवर कारवाई करून प्रत्येकी २०० रूपये असे एकुण ८ हजार रूपये दंड म्हणुन वसुल करण्यात आले.

ही कारवाई पारोळा पोलिस स्टेशन चे इकबाल शेख,किशोर पाटील,रविंद्र रावते,जितेंद्र पवार,दिपक आहिरे,यांनी केली,तसेच या कारवाईत पुढेही ही सात्यत राहील असे सांगण्यात आले,तरी नागरीकांनी काळजी घ्यावी तोंडाला मास्क बांधावा सोशल डिस्टन्ट ठेवावा आपली व आपल्या कुंटुबा ची काळजी घ्यावी असे आहावान पारोळा पोलिस निरिक्षक लिलाधर कानडे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.