परळीत पंकजा मुंडेंच्या बॅनरमध्ये भाजपचा उल्लेख नाहीच !

0

बीड : उद्या १२ डिसेंबरला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती आहे. जयंतीनिमित्त भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे या गोपीनाथ गडावरकार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच परळीत स्वाभिमान दिन साजरा करण्यात येणार आहे. उद्या होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे पंकजा मुंडेंच्या या मेळाव्यातून भाजप गायब असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. पंकजांच्या पोस्टर्सवर कुठेही भाजपचं कमळ चिन्ह नाही. मेळाव्याच्या ठिकाणी भाजपचे झेंडेही नाहीत. त्यामुळे पंकजांनी खरंच वेगळा मार्ग निवडला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा परिस्थितीत पंकजा मुंडेंच्या भूमिकेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, यानिमित्ताने भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे यांच्यासह दिग्गज नेते हजर राहणार आहेत.

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांनी उद्याच्या दिवशी स्वाभिमान दिवस असा नारा देत निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे. उद्याच्या कार्यक्रमानिमित्त लोकनेत्याला अभिवादन करणारे हजारो बॅनर्स शहरात लावण्यात आले आहेत. मात्र यातील एकाही बॅनरवर भाजपचे चिन्ह नाही. यामुळे तर्कवितर्क काढले जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.