भारतीय संगीतातला एक स्वर्गीय सूर हरपला ! पद्मविभूषण पंडित जसराज यांचं निधन

0

वॉशिंग्टन : भारतीय शास्त्रीय संगीताचे दिग्गज पद्मविभूषण पंडित जसराज यांचं निधन झाल्याची दु:खद बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जसराज यांनी अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला. पंडित जसराज यांच्या जाण्यामुळे संपूर्ण संगीत आणि कला विश्वावर शोककळा पसरली आहे.

पंडित जसराज यांचा जन्म 24 जानेवारी 1930 ला झाला. शास्त्रीय गायकांपैकी ते एक भारतातील प्रसिद्ध गायक आहेत. भारत सरकारने २००० मध्ये संगीत क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौवरले होते. पंडित जसराज हे मूळचे तबलजी होते. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे समजल्याने त्यांनी तबला वादन सोडून गायक बनायचे ठरवले. त्यांचे मोठे बंधू मणिरामजी यांनी त्यांना गाणे शिकवले. भारतीय संगीतातला एक स्वर्गीय सूर हरपला अशीच भावना संगीत रसिकांच्या मनात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.