जिल्ह्यात आज २८७ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले

0

जळगाव (प्रतिनीधी) : जिल्ह्यात आज दिवसभरात २८७ रुग्ण आढळून आले आहे. दिलासादायक बाब अशी आज रूग्ण संख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज दिवसभरात तब्बल ३३० रूग्ण बरे झाले आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १८ हजार ५८४ वर पोचली.

आज २८७ रूग्ण आढळले असून त्यात सर्वाधिक ६६ रूग्ण हे जळगाव शहरातील आहे. त्याखालोखाल जळगाव ग्रामीण १५, भुसावळ ०४, अमळनेर १९, चोपडा ५०, पाचोरा ०४, भडगाव १३, धरणगाव ११, यावल १५, एरंडोल ०७, जामनेर १२, रावेर ०४, पारोळा २१, चाळीसगाव २४, मुक्ताईनगर १७, बोदवड ०६, अन्य जिल्ह्यातील १ असे एकूण २८७ रूग्ण आढळून आले.

आज दिवसभरात ०९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृताचा आकडा ६७१ वर गेला आहे. तर आज ३३० रूग्ण बरे झाले आहे. जिल्ह्यात एकूण १२ हजार ७७४ रूग्ण हे बरे झाले आहे. जिल्ह्यात ५ हजार १३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.