पथनाट्य व कलपथकातून मतदार जन जागृती।

0

जामनेर(प्रतिनिधी):-भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आऊटरिज ब्युरो,गीत व नाटक विभाग महाराष्ट्र , गोवा व भारत निवडणूक आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकरंजन बहुउद्देशीय संस्था, जामनेर जिल्हा-जळगांव यांच्या वतीने संतोष सराफ व सहकारी यांनी मतदार जन जागृतीवर उत्कृष्ट रित्या पथनाट्य सादर केले . या कार्यक्रमाचे उद्घाटन निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते यांनी चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून केले.तसेच तहसीलदार अरुण शेवाळे,पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे,ग्रामस्थ व पत्रकार उपस्थित होते जामनेर शहरात तहसील कार्यालय, बस स्थानक,गांधी चौक तसेच शहरातील महाविद्यालय व महत्वाचे चौक या ठिकाणी जनजागृती करण्यात आली.व शहरात चित्ररथ फिरवून मतदार जनजागृती करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.