पत्रकार बी.एन.पाटील कोरोना योद्धा म्हणून सन्मानित

0

भातखंडे (प्रतिनिधी) : कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालयातील जेष्ठ शिक्षक तथा पत्रकार बी.एन. पाटील यांनी कोरोना विषाणू सारख्या महामारीत पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात जाणीव जागृती करून कोविड-१९ या जीवघेण्या महामारीचा सामना करण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली होती. या कालखंडात त्यांनी भरीव असे योगदान दिले त्यांचे उल्लेखनिय कार्य आणि त्याच बरोबर ह्या आजाराबद्दल जाणीव जागृती केली याचे सर्वेक्षण ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे यांच्यामार्फत करण्यात आले.

त्यांच्या पत्रकारितेच्या कामाची दखल घेऊन “कोविड योद्धा सन्मान पत्र सन २०२०”बहाल करून सन्मानित करण्यात आले आहे. म्हणून कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील,सचिव सौ डॉ पुनमताई प्रशांत पाटील, संचालक प्रशांत विनायक पाटील व महाराष्ट्र माझा न्यूज चॅनेल चे पत्रकार पाचोरा तालुका प्रतिनिधी कुंदन बेलदार भातखंडे शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.