पत्नीला नांदवायला पाठवत नसल्याने जावयाचा सासूवर चाकू हल्ला

0

जळगाव – पत्नीला नांदवायला पाठवत नसल्याच्या कारणावरून जावयाने दारूच्या नशेत पत्नीसह सासूवर चाकू हल्ला केल्याची घटना दि.१८ रोजी दुपारी दीक्षितवाडी येथे घडली. दरम्यान याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनाला गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ल्यातील सासूला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शहरातील दीक्षितवाडी येथील माहेर असलेल्या जयश्री दिलीप गायकवाड (२५) हिचा राजेंद्र भदाणे याच्याशी प्रेमविवाह झाला आहे. लग्नानंतर दोघेही अहमदाबाद (गुजरात) येथे काही दिवस सुखाने राहिले. मात्र,दोघात वाद होऊन जयश्री या माहेरी परतल्या होत्या. पत्नीला नांदवायला पाठवत नसल्याच्या कारणावरून  राजेंद्र सासूवर दबाव आणत होता.दरम्यान, दि.१८ रोजी दुपारी राजेंद्र याने दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करीत तिच्यावर चाकू उगारल्याने तिची आई जमनाबाई गायकवाड यांनी मुलीचा बचाव करण्यासाठी मध्ये आल्याने जमनाबाईच्या हातातून चाकू आरपार निघाला. दरम्यान चाकूहल्ला करणाऱ्या राजेंद्रला शेजारच्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. जखमी महिलेवर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.