अंतुर्लीत सार्वजनिक वाचनालयात ग्रंथप्रदर्शन व वाचन दिन साजरा

0

मुक्ताईनगर : तालुक्यातील अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात ग्रंथप्रदर्शन व  वाचन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रंथालय चळवळीचे प्रणेते  रंगनाथन यांच्या प्रतिमेस  वाचनालयाचे अध्यक्ष  एस.ए.भोई  सर यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची  सुरुवात  करण्यात आली.

शासन परिपत्रकानुसार आज दि 19 रोजी ज्ञानोदय अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले सार्वजनिक वाचनालयात वाचन दिन व ग्रंथप्रदर्शन भरवण्यात आले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस ए भोई सर यांनी वाचना संदर्भात मार्गदर्शन केले. वाचनालयात बालविभाग महिला विभाग व पुरुष विभाग या विभागाच्या बाबतीत माहिती दिल्ली ग्रंथालयात एकूण 26000 ग्रंथ वर्तमानपत्रे 20 व 65 नियतकालिक  तसेच या वाचनालयात 350  वाचक आहेत यावेळी शरद महाजन संजय वाडीले सोपान भाई बारी सर गणेश नावकर ब्रिजलाल भाई हिरामन भोई भानुदास पाटील भैय्या शेख लहू वाडीले ज्ञानेश्वर चांगदेव कर ग्रंथपाल मधुकर वानखेडे व वाचक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.