पंतप्रधान मोदींच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भडगाव भाजपातर्फे फळवाटप

0

भडगाव (प्रतिनिधी) : भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त आज भडगाव तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, भडगाव, शासकीय आयटीआय येथील कोविड सेंटर तसेच पाचोरा रोड येथील गरीब वस्ती, शांतीनगर, भडगाव पेठ येथील गरीब वस्तीत तसेच गुढे,कजगाव येथील गरीब वस्तीत भाजपा भडगाव तालुक्याच्या वतीने फळेवाटप करण्यात आलेत.

भाजपाच्या वतीने पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने तालुक्यात फळेवाटप करण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील, माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, बन्सीलाल परदेशी, किरण शिंपी, प्रमोद पाटील, शुभम सुराणा, शेखर बच्छाव, भूषण देवरे, वसंत वाघ, अमोल सोनार तसेच गुढे येथे दादा भिला पाटील, रघुनाथ महाजन, विजय महाजन, पद्माकर कुलकर्णी,कजगाव येथील डॉ. संजय पाटील, भूषण सिनकर, विनोद हिरे, भूपेंद्र मौर्य, रोशन तिवारी, रवि पाटील, सारंग पवार, दिपक वाघ इ. कार्यकर्ते तसेच शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज जाधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.