पंचायत समितीमध्ये महीलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

0

जामनेर :- गेल्या तीन वर्षापासून अतिक्रमणाचा प्रलंबित विषय वेळोवेळी सांगूनही अधिकाऱ्यांकडून न्याय मिळत नसल्याने पंचायत समितीमधे गटविकास आधिकारी यांच्या समोर महिलेने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान कार्यालयातील कर्मचारी व कार्यकर्त्यांनी महिलेजवळील कॅन हिसकावून घेतल्याने अनर्थ टळला. सुनंदा सोनार असे या महिलेचे नाव असून त्या पळासखेडे बु येथील रहिवासी आहेत.

महिलेच्या म्हणण्यानुसार, सुनंदा सोनार त्यांच्या मालकीच्या अतिक्रमण काढण्याबाबतच्या विषयीचा वाद हा गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित आहे. हा विषय स्थानिक ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील असल्याने सुनंदा सोनार यांनी ग्रामपंचायत ते जिल्हा पातळीवरील अधिकार्यांकडे न्यायासाठी दाद मागितली. परंतु कुठूनही न्याय मिळत नसल्यामुळे सुनंदा यांनी टोकाचे पाउल उचलत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अजय जोशी यांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी महीलेला ताब्यात घेऊन सदर महीलेवर प्रशासकीय कामात अडथळा आदी कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.घटनेचे साक्षीदार म्हणुन गटविकासअधिकारी अजय जोशी, कक्षाधिकारी कैलास पाटील,आर डी कपले आहेत.

घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे.प्रशासनास वारंवार वेठीस धरण्याचा प्रकार असुन,सदरच्या जमिनीवर अतीक्रमण आहे हे सिध्द झालेले नाही. भुमीअभिलेख कार्यालयाने मोजणी केल्यानंतर त्या जागेवर अतीक्रमण असेल तर संबंधित ग्रामपंचायत दोन महीण्याच्या आत सर्व अतीक्रमण काढुन टाकेल.
– अजय जोशी
गटविकासअधिकारी, पंचायत समिती,जामनेर

Leave A Reply

Your email address will not be published.