नोकरीची संधी

0

नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे ‘अप्रेंटिसशिप ट्रेनिंग’साठी १८० (पुरुष/महिला) आयटीआय पात्रताधारक आणि १० वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती.

एक वर्षांच्या ट्रेनिंगसाठी

(ए)    फिटर –  १५ पदे,

(बी)    मशिनिस्ट – १०,

(सी)    शीट मेटल वर्कर – १५,

(डी)    वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिकल) – १५,

(ई)    प्लंबर – १०,

(एफ)   मेसॉन (बीसी) (गवंडी) (बिल्डिंग कन्स्ट्रक्शन) – १०,

(जी)    मेकॅनिक मशीन टूल मेन्टेनन्स –  ५,

(एच)   मेकॅनिक रेफ्रिजरेटर आणि ए.सी. – ५,

(आय) मेकॅनिक डिझेल – १५,

(जे)    टेलर (जनरल) – ५,

(के)    पेंटर (जनरल) – १०,

(एल्)   पॉवर इलेक्ट्रिशियन – २०,

एकूण १३५ पदे.

दोन वर्षे कालावधीचे ट्रेनिंग –

(ए)    शिपराइट (स्टील) – फिटर – १० पदे,

(बी)    पाइप फिटर (प्लंबर) – १० पदे,

(सी)    शिपराइट (वुड) – कारपेंटर – १५ पदे,

(डी)    रिग्गर फ्रेशर – ५ पदे,

(ई)    क्रेन ऑपरेटर (ओव्हरहेड स्टील इंडस्ट्री) – फ्रेशर ५ पदे.

पात्रता – सर्व पदांसाठी ८ वी किंवा १० वी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. संबंधित ट्रेडमधील आयटीआय परीक्षा किमान  ६५% गुणांसह उत्तीर्ण.

(रिग्गर आणि क्रेन ऑपरेटर या पदांसाठी आयटीआय पात्रता धारण करण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच दहावी उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत.) एकूण ४५ पदे.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ एप्रिल, १९९७ ते ३१ मार्च, २००४ दरम्यानचा असावा. कमाल वयोमर्यादेत अजा/अजसाठी ५वर्षांची सूट.

शारीरिक मापदंड – उंची – १५० सें.मी. वजन – ४५ कि.ग्रॅ. छाती – किमान ५ सें.मी. फुगविता आली पाहिजे. स्टायपेंड – ट्रेनिंगदरम्यान नियमानुसार मिळेल. दहावी आयटीआयच्या गुणवत्तेनुसार शॉर्ट लिस्टेड उमेदवारांसाठी निवड पद्धती – जानेवारी, २०१८ च्या शेवटच्या आठवडय़ात लेखी परीक्षा आयोजित केली जाईल.

कालावधी – दोन तास. १०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न. सामान्य विज्ञान, सामान्य ज्ञान आणि गणित या विषयांवर आधारित प्रश्नपत्रिका हिंदी/इंग्रजी भाषेत छापलेली असेल. ओएमआरवरील चुकीच्या उत्तरांना गुण वजा केले जाणार नाहीत.

परीक्षा केंद्र मुंबईतच असतील. परीक्षेचा दिनांक, वेळ आणि लेखी परीक्षेचे ठिकाण उमेदवारांना ऑनलाइन कॉलअप लेटरमधून कळविले जाईल.

तसेच भरतीविषयी सर्व माहिती www.bhartiseva.com  किंवा www.indiannavy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाईल. लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवारांना मुलाखत/ स्किल टेस्टसाठी फ्रेबुवारी, २०१८ मध्ये बोलाविले जाईल. त्यानंतर वैद्यकीय तपासणी घेतली जाईल.

ट्रेनिंग एप्रिल, २०१८ पासून सुरू होणार.

ऑनलाइन अर्ज www.bhartiseva.com या संकेतस्थळावर दि. ३० डिसेंबर, २०१७ पर्यंत करावेत.

अर्जासोबत पुढील कागदपत्र पीडीएफ  फॉरमॅटमध्ये संकेतस्थळावर अपलोड करावीत.

पासपोर्ट साइज फोटो, एसएस्सी मार्कलिस्ट/प्रमाणपत्र, जन्म तारखेचा पुरावा, आठवीची मार्कलिस्ट (जरुरी असल्यास), आयटीआय मार्कशीट,  अजा/अज/इमावसाठी जातीचा दाखला (इमावसाठी नॉन-क्रीमी लेअर दाखल्या सोबत), पॅनकार्ड/आधारकार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र, आधारकार्ड अपलोड करणे आवश्यक, विकलांग असल्यास तसे प्रमाणपत्र. उमेदवारांना कोणतीही फी भरावयाची नाही. फक्त एकच अर्ज करावयाचा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.