निंभोरी तांडा येथील युवकाचा शाॅक लागुन मृत्यू

0

पाचोरा (प्रतिनिधी) :तालुक्यातील निंभोरी तांडा येथील युवकाचा विजेचा तीव्र शाॅक लागुन मृत्यु झाल्याची दुःखद घटना घडली. घटने प्रकरणी पिंपळगाव (हरे.) पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

निंभोरी तांडा ता. पाचोरा येथील अनिल साईदास जाधव यांचा मोठा मुलगा अल्पेश अनिल जाधव हा दि. २० जुलै रोजी गावातील मंदिरामध्ये श्रावण महिन्यानिमीत्त हुनमान चालिसा वाचनाच्या कार्यासाठी लाईटींगची व्यवस्था करीत असतांना कल्पेश अनिल जाधव (वय – १७) याचा विजेचा तीव्र झटका बसला असता तो गंभीर जखमी झाला. त्यास तात्काळ पाचोरा येथे रुग्णालयात नेत असतांना रस्त्याच त्याचा मृत्यू झाला. कप्लेशच्या अचानक निधनाने जाधव परिवार व संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. कल्पेश हा निभोंरी ग्रामपंचायत समितीचे सदस्य तथा ओम साई टेंन्ट हाऊसचे संचालक अनिल जाधव जेष्ठ चिरंजीव होते.

Leave A Reply

Your email address will not be published.