निंभोरा ग्रामपंचायत उपसरपंचपदी कमलबाई मोरे यांची बिनविरोध निवड

0

भडगाव प्रतिनिधी : तालुक्यातील निंभोरा ग्राम पंचायतीचे उपसरपंच वस्तलला पाटील कार्यकाळ पूर्ण झाल्याने या उपसरपंच पदाची निवडीचा कार्यक्रम दि.30 रोजी लागला होता. उप सरपंच पदासाठी सौ.कमलबाई आण्णा मोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमतेबिनविरोध निवड करण्यात आली.

ग्रामविकास अधिकारी सुनीता चौधरी यांनी यावेळी निवडणुकीचे कामकाज पाहिले. या वेळी ग्राम पंचायत सरपंच दिलीप पाटील, यासरपंच दिलीप पाटील, सदस्य, त्रंबक पाटील, साहेबराव पाटील, महादू भिल्ल, वस्तलाबाई पाटील, ज्योती पाटील, मंगलाबाई बाविस्कर, वैशाली पाटील, गौतम मोरे, भगवान पाटील, निंबा भोई, कैलास भोई, संतोष सपकाळे आदी सदस्यांनी एकमताने निवड बिनविरोध निवड करून सत्कार करण्यात आला.

यावेळी उपसरपंच पती आण्णा मोरे, नितीन मोरे, हरिश मोरे, पुंडलिक कोळी, वाल्मीक पाटील समाधान पाटील, निंबा पाटील, भगवान पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी सूत्रसंचालन हेमंत पाटील यांनी केले.तर आभार आण्णा मोरे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.