नाशिक मनपाचे काटकसरी धोरण

0

नाशिक/प्रतिनिधी 

मनपाचे उत्पन्न करोना मुळे घटल्याने मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी काटकसरी धोरण अवलंबिले आहे. त्यांनी विकास कामे करताना त्रिसुत्री आखली. यात मंजूर कामे , निविदा प्रक्रियेतील कामे व कार्यारंभ आदेश दिलेल्या कामांनाच मंजुरी दिली जाणार आहे.

भाजपची सत्ता असल्याने “होऊ दे खर्च ” चे मुडदे असणारे नगरसेवक अडचणीत आले आहे. वर्षापासून सुरू असलेल्या करोना संकटामुळे घरपट्टी, पाणीपट्टी व नगररचना विभागाच्या उत्पन्नांना फटका बसला. हक्काचे उत्पन्न घटल्याने महापालिका कारभार आता जी एस टी वर अवलंबून आहे. अर्थसंकल्पात अपेक्षित असलेले उत्पन्न चारशे कोटी रूपयांची कमी झाले आहे.

त्यामुळे चालू अर्थसंकल्पात शिल्लक वाढवून 2300 कोटी पर्यंत फुगविण्यात आले आहे. अर्थसंकल्प मोठा दिसत असला तरी हातात रक्कम नसल्याने नव्या कामाला प्रतिबंध घालण्यात आला आहे. आयुक्तांच्या या भूमिकेचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.