नार – पार खोऱ्यातील पाणी गुजरातला न देण्यासंदर्भात शरद पवार यांना निवेदन

0

पाचोरा –  नार – पार खो-यातील पाणी गुजरात राज्याला न देता, गिरणा खो-याला प्राधान्याने देण्यात यावे. तसेच गुजरात राज्याला पाणी

देण्यासंदर्भातील करार रद्द करण्यात यावेत. अशा आशयाचे निवेदन पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अॅड. विश्वासराव भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्हयातील पेठ सुरगाणा तालुक्यातील नार-पार खोऱ्यातील पाणी गुजरात राज्याला देण्यासंदर्भात मागील काळात करार झाले आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रावर अन्याय होणार आहे व होत आहे. तरी नार-पार खो-यातील पाणी गुजरात राज्याला न देता प्रचंड तुटीच्या असलेल्या गिरणा खोऱ्याला देण्यात यावे.

तसेच राष्ट्रीय जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, हैदराबाद या संस्थेने दि. ११ जानेवारी २०११ रोजी नार-पार गिरणा लिंक प्रस्ताव तयार केलेला आहे. तरी सदर प्रस्तावाची प्राधान्याने अंमलबजावणी करण्याचे आदेश आपल्या मार्फत महाराष्ट्र

शासनाला व्हावेत. तसेच तात्कालीन केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दि. १५ जानेवारी २०१५ रोजीच्या बैठकीत पार-तापी- नर्मदा लिंक प्रस्तावास मान्यता देण्यात येवुन नार – पार खोऱ्यातील ३२ टी. एम. सी. पाणी गुजरात राज्यात साबरमतीमार्गे देण्याचा प्रस्ताव तयार झालेला आहे व तसा करार होवुन त्यास तत्कालीन महाराष्ट्र शासनाने संमती दर्शविलेली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील जनतेवर फार मोठा अन्याय झालेला आहे. कारण नार – पार पश्चिम वाहिनी नदीतील पाणी पुर्ववाहिनी असलेल्या गिरणा खोऱ्यात वळविल्यास उत्तर महाराष्ट्र जनतेची ४० वर्षांपासुनची असलेली मागणी पुर्ण होईल. कारण गिरणा खोरे हे प्रचंड त्रृटीचे खोरे असन १९७२ च्या दुष्काळापेक्षा ही तीव्र स्वरूपाचे दुष्काळ उत्तर महाराष्ट्राने वेळोवेळी अनुभवलेले आहेत. तसेच नार-पार खोऱ्यातील पाणी गिरणा खोऱ्याला दिल्यास सुमारे

८२ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येवुन शेती सिंचनाचा, पिण्याच्या पाण्याचा,

उद्योगासाठी लागणा-या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटण्यास मदत होईल व नाशिक, जळगांव धुळे जिल्हयातील १७ तालुक्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटल,

दि.११ जानेवारी २०२० रोजी आपण मा. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे बैठक घेवुन नार – पार खो-यातील पाणी त्रृटीच्या गिरणा खो-याला वळविण्यासंदर्भांत आपल्या माध्यमातुन प्रयत्न सुरू केलेले आहेत. ही आमच्यासाठी व

उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी, जनतेसाठी समाधानाची बाब आहे. तरी नार-पार खो-यातील पाणी गुजरात राज्याला देण्यासंदर्भात मागील काळात झालेले करार रद्द करून नार – पार खो-यातील उपलब्ध पाणी प्रचंड त्रृटीच्या गिरणा खो-याला देण्यात येवुन नार – पार गिरणा नदीजोड योजना प्रकल्प राबविण्यात यावा व उत्तर महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करावा. अशा आषयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अॅड. विश्वासराव भोसले यांनी दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.