नाराज एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला

0

नवी दिल्ली: भाजपावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले आहेत. दरम्यान,  खडसे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आहेत. खडसे आणि पवार यांच्यामध्ये गेल्या १५ मिनिटांपासून चर्चा सुरू आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

खडसेंनी परवाच स्पष्ट शब्दांत त्यांची नाराजी व्यक्त करत पक्षाकडून असाच अन्याय होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांची शरद पवारांसोबतची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.  खडसे हे दिल्लीत महाराष्ट्राचे प्रभारी भुपेंद्र यादव यांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.