खिडकीत टांगलेली पॅन्टमधील चाबी काढून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची कार लांबविली

0

जळगावमधील खेडी शिवारातील घटना

जळगाव : लोखंडी पाईपच्या साहाय्याने सुरुवातील खिडकीत टांगलेली पॅन्टमधील चाबीने ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांच्या अंगणात उभी कार चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर चोरट्यांनी पॅन्टच्या खिशातील 4 हजाराची रोकड काढून पॅन्ट अंगणात टाकून पोबारा केला आहे. स्वप्निल रामचंद्र पवार (रा. खेडी शिवार) असे या कार चोरून नेलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेडी शिवारात स्वप्निल पवार हे वडील, आई, पत्नी, भाऊ, वहिणी याच्यासह वास्तव्यास आहे. एमआयडीसीत नवीन गुरांचे बाजारासमोर त्यांचे एस.पी.रोडलाईन्स या नावाचे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. दरम्यान त्यांचे भाऊ नोकरी निमित्त दिल्लीत राहत असून त्यांची कार (क्र एम.एच.19.बी.जे.9977) ही स्वप्निल पवार वापरत आहेत. 6 डिसेंबर रोजी पवार यांचे औरंगाबाद येथून त्यांचे मित्र भिकन सोनवणे आले. त्याच्यासोबत हॉटेलात जेवण करुन पवार यांनी रात्री 11.30 वाजेच सुमारास कार नेहमीप्रमाणे घरासमोर पार्किंग केली. हॅन्डल लॉक करुन चाबी पॅन्टच्या खिशात ठेवून झोपून गेले. चोरट्यांनी लोखंडी पाईपच्या सहाय्याने बेडरुममध्ये हँगरला लटकवलेली पॅन्ट काढली. या पॅन्टच्या खिशात कारची चाबी होती ती मिळविली. यानंतर पॅन्टमधील चार हजाराची रोकडही काढून घेत, पॅन्ट अंगणात टाकून दिली. तसेच मिळविलेल्या चाबीच्या सहाय्याने कारचे लॉक उघडून कार घेवून पोबारा केला. पवार सकाळी उठले असता, त्यांना पॅन्ट अंगणात तर लोखंडी पाईप खिडकीला लावलेला दिसला. यानंतर कारचोरीचा प्रकार समोर आला.

दरम्यान त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज असता त्यात कॅमेर्‍यात 7 रोजी पहाटे 3.33 वाजेच्या सुमारास कार अजिंठा चौफुलीकडे जात असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी स्वप्निल पवार यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात 2 लाखांची कार, पॅन्टमधील 4 हजार रुपये रोख तसेच पॅनकार्ड असा 2 लाख 4 हजाराचा ऐवज लांबविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.