नांद्रा, पिंपळगावहरे व जारगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा

0

केंद्र व राज्य शासनावर देवकर यांचा घणाघती हल्ला

पाचोरा :- नांद्रा ता.पाचोरा येथे आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमी वर राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव लोकसभेचे अधिकृत उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारासाठी येथील लोढीया जिनमध्ये गटाचा ग्रुप मेळावा घेण्यात आला. सर्वात आधी येथील जागृत देवस्थान द्वी पींडी महादेव मंदिरावर प्रचाराचा नारळ फोडून गुलाबराव देवकर सभेच्या ठिकाणी पोचले.

कार्यक्रमास राष्ट्रवादी चे जिल्हा प्रमुख रविद्र पाटील, पाचोरा भडगावचे माजी आमदार दिलीप वाघ, कार्याअध्यक्ष विलास पाटील, पी.टी.सी.चे संजय वाघ, खलील देशमुख, नितिन तावडे, नगसेवक विकास पाटील, पंचायत समितीचे गटनेते ललीत वाघ,
बांबरुडचे सरपंच राजेंद्र वाघ, कुरंगी सरपंच दिपक पाटील, भोला पटील गजानन पवार, साहेबराव तावडे, विनोद तावडे, प्रमोद सुर्यवंशी, अनिल तावडे यांच्या सह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादीचा पाचोरा भडगाव तालुक्यातील गट निहाय मेळ्याव्याची सुरुवात नांद्रा येथुन झाली. राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख रविद्र पाटील ,योगेश देसले,दिलीप वाघ, खलील देशमुख, साहेबराव तावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या संपूर्ण मतदारसंघात लोकप्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारची विकास कामे केलेले दिसत नाही. जे विकास झाली ती सर्व आघाडी सरकारच्या काळातील आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत आहे. बोंळआळीच्या अनुदाना व्यतीरीक्त कोणतेही ठोस विकास कामे झालेली नाही. दिड लाखा पर्यत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना अद्याप पर्यत कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याची टिका माजी आमदार दिली वाघा यांनी केली. लोकसभेची जळगाव मतदारसंघाची जबाबदारी मला शरदचंद्र पवार यांनी सर्वात आधी मला दिली. भा.ज.पा.जवळ अद्याप पर्यत माझ्या समोर उमेदवार कोण द्यावा मवया साठी चाचपणी सुरू आहे. पाच वर्षात मोदींनी फक्त जाहिरात बाजीच केली “अच्छे दिन आगये” आमच्या घरातही नातु पंतु हरहर मोदी म्हणत होते. त्यांना काय माहित. जळगाव च्या सभेत बेरोजगारी, कापुस, केळी संदर्भात दिलेले सर्व आश्वासन फेल ठरली आहे. कार्यकर्त्यांना घराघरात जाऊन प्रचार कसा करावा या बाबतही गुलाबराव देवकर यांनी मार्गदर्शन केले.

मोहाडी व बांबरुड येथील कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या सत्कार रविद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्तविक विधानसभा क्षेत्र प्रमुख नितिन तावडे, सुत्रसंचलन ग्रा.प.सदस्य योगेश सुर्यवंशी तर आभार गटनेते ललीता वाघ यांनी केले. यशस्वीतेसाठी साहेबराव तावडे, विशाल तावडे, बंटी सुर्यवंशी, सामनेरचे राजेंद्र साळुंखे, रविद्र पाटील बाळकृष्ण पाटील, गोरख नेरपेगार, दिनकर पाटील, नरेंद्र पाटील, संतोष चव्हाण, बालू चव्हाण, बाबाजी पाटील, गुलाब पाटील,आमिन शेख, युनूस बाबेखा, गोपी पाटील यांच्या सह कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.