दोन वर्षापासून फरार असलेली महिला पोलिसांच्या ताब्यात

0

भुसावळ :- गेल्या दोन वर्षापासून फरार असलेली महिला आरोपी अंजू परवेज हिला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.
भुसावळ बाजारपेठ पो.स्टे, भाग 5 गुरुन 13/2016 भादवि कलम-353,323,34 मधील फरार महिला आरोपी अंजु परवेज अली इराणी (रा.पापा नगर भुसावळ) हीला मिळालेल्या गुप्त माहिती वरुन जळगाव येथे सालर नगर मधील जळगाव एमआयडीसी पोलिसाच्या मदतीने सदर फरार महिला आरोपी हिला सदर गुन्ह्यात अटक केली. या महिला आरोपीने अटक पूर्व जमीन घेतल्या बाबतचे कागदपत्रे सादर केली आहे. ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक दत्तात्रय गुळीग, स फो तस्लिम पठाण, पो हे का सुनील जोशी, पो ना रविंद्र बिऱ्हाडे, म पो ना आश्विनी जोगी, पो का विकास सातदिवे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.