नांदेड येथील प्रा.आ.केंद्राचे छत कोसळले

0

जळगांव.दि.22-
धरणगाव तालुक्यातील नांदेड येथील चाळीस ते बेचाळीस वर्ष व मुदत संपलेल्या जीर्ण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुमजली इमारतीतील वैद्यकीय अधिकारी कक्षासमोर असलेल्या व्हरांड्याचा गॅलरीजवळचा भाग मंगळवारी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास अचानक कोसळला . यावेळी सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
नांदेड प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण स्वरूपात असून धोकेदायक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला 45 वर्ष पूर्ण झाले असल्याने जीर्ण बनली आहे. धोकादायक इमारतीतच वैद्यकीय अधिकार्‍यांसह कर्मचारी रुग्णांना सेवा देत आहेत. याकडे संबधित जि.प. आरोग्य विभागाचे लक्ष नसल्याचा आरोप केला जात आहे.
मंगळवारी सकाळी वैद्यकीय अधिकारी कक्षासमोरील काही भाग अचानक कोसळला. यावेळी आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी होती. मात्र सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. आरोग्य केंद्राच्याच इमारतीवर उपचार करण्याची वेळ आली असल्याची चर्चा आहे. आरोग्य विभागाने याची गांभीर्याने दखल घेवून आवश्यक उपाययोजना कराव्या, अशी मागणी केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.