नशिराबाद येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाची सांगता

0

सत्रासेन, चोपडा  | प्रतिनिधी 

नशिराबाद-येथे कृषिदूत रुपेश नारायण भोळे यांची ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाची नुकतीच सांगता  झालेली असून त्यांनी शेतकऱ्यांना विविध मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित केले असल्याचे त्यांनी सांगितले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी कृषिदूत रुपेश भोळे याने आपल्या गावी ग्रामीण कृषी कार्यानुभव(Village Attachment)हा दहा आठवड्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता.यामध्ये त्याने शेतकऱ्यांच्या व प्रतिष्टीत नागरिकांची भेटी घेतल्या व त्यांच्याशी संवाद साधला आणि कोरोना व त्याबद्दल लोकांमध्ये जन जागरूकता या संबंधी चर्चा झाली.या कार्यनुभव कार्यक्रमाअंतर्गत शेतातील माती परिक्षण,बीजप्रकिया,एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन,शेतीतील अवजारांचा वापर,जनावरांचे दूध वाढीसाठी उपाययोजना,शेतमाल प्रक्रिया,आधुनिक शेती,सेंद्रीय शेती,नवीन कलमांची व रोपांची लागवड तंत्रज्ञान, फळबाग नियोजन,विविध अँप्स द्वारे या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.तसेच विविध विषयांची प्रात्यक्षिके केली व त्यावर मार्गदर्शन केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य.शैलेश तायडे सर,उपप्राचार्य.पी.एस. देवरे सर,कार्यक्रम समनव्यक प्रा.ए. डी. फाफळे सर,कार्यक्रम अधिकारी व्ही.एस.राणे मॅडम व विषय विशेषज्ञ ए.बी.पासेकर सर,मोनिका भावसार मॅडम,बी.बी.मुंडे सर,सुरेंद्र इंगोले सर शुभम गोदरे सर,विशाल दळवी सर,अश्विनी मते मॅडम,पी.व्ही.सावळे मॅडम व इतर प्राध्यापक वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे असं त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.