नवीन वर्षात गॅस दरवाढीचा भडका ; जाणून घ्या आजचा दर

0

नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरुवात गॅस दरवाढीने झाली आहे. सलग पाचव्या महिन्यात सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली असून  वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस कंपन्यांनीने विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर  (14.2 किलो)च्या दरात १९ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता घरगुती गॅस 749 रुपयांना मिळणार आहे. तसेच व्यावसायिक सिलिंडर (19किलो)च्या किंमतीत 29.50 वाढ करण्यात आल्याने आता सिलिंडर घेण्यासाठी 1325 रुपये मोजावे लागणार आहेत. सिंलिंडरचे नवीन दर आजपासून (बुधवार) लागू करण्यात येणार आहे.

मे-जूनपासून सिलिंडरच्या दरात वाढ होत आहे. चीन आणि अमेरिका यांमधील व्यापारी संघर्षाने जागतिक कमोडीटी बाजारावर परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमतींवर परिणाम होत असल्याने पेट्रोलियम कंपन्या एलपीजीच्या किंमतींचा आढावा घेत आहेत.

1 ऑक्टोबरला देखील देशातल्या मुख्य शहरातील विनाअनुदानित गॅस सिलिंडर 15 रुपयांनी महागला होता. नवी दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरसाठी 605 रुपये मोजावे लागत होते. कोलकात्यात याच सिलिंडरचा दर 630 रुपये द्यावे लागत होते. मुंबई, चेन्नईमध्ये 14.2 किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरचे दर क्रमशः 574.50 आणि 620 रुपये झाले होते. तर 19 किलोग्राम सिलिंडरची दिल्लीतली किंमत 1085 रुपये झाली होती. कोलकात्यात 1139.50 रुपये, मुंबई 1032.50 रुपये आणि चेन्नईमध्ये याच 19 किलोच्या सिलिंडरचे दर 1199 रुपये होती.

Leave A Reply

Your email address will not be published.