नवीन जोशी कॉलनीत 24 तासानंतर आले लाईट

0

जळगाव :– सोमवारी दि. 24 रोजी दुपारी 3 वा. गेलेले लाईट मंगळवारी तब्बल दुपारी 3 वा. आले. त्यामुळे गेले दोन दिवस भयंकर उकाड्याने आबालवृद्धांसह नागरिक चांगलेच हैराण झाले.

लाईट आल्यावर फुटली डीपी
सोमवारी दुपारी 3 वा. वीज मंडळाकडून काही कामानिमित्त नवीन जोशी कॉलनी परिसरात वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. लाईट संध्याकाळी 7 वा. आले. त्यानंतर लगेचच हेमू कालाणी उद्यानासमोरील डीपी अचानक फुटल्याने रात्रभर वीज पुरवठा खंडीत झाला होता. दुसर्‍या दिवशी मंगळवारी सकाळी 11 वा. लाईट येणार असे वीज मंडळाच्या कर्मचार्‍यांकडून सांगण्यात आले.

प्रत्यक्षात दुपारी 3 वा. आले लाईट
वीज मंडळ कर्मचार्‍यांकडून मंगळवारी सकाळी 11 वा. लाईट येणार असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात दुपारी 3 वा. लाईट आले. दुपारी 1 वाजेपर्यंत नादुरुस्त डीपी बदलण्याच्या कामाला सुरुवातच झाली नाही. नादुरुस्त डीपी काढून नवीन आणलेली डीपी लावण्यात आली. त्यानंतर अर्धा तास डीपी वार्मिंगला ठेवण्यात आली त्यानंतर विद्युत प्रवाह सुरळीत करण्यात आला. तोपर्यंत आबालवृद्धांसह नागरिक हवालदिल झालेले होते. रात्री मागणी केल्यानंतर सकाळी नवीन डीपी ताब्यात मिळाली. हॉटेल महेंद्रजवळ मेनलाईनचा तार तुटला होता. तो लावणेही गरजेचे होते. त्यामुळे उशीर झाला तसेच अतिउष्णतेने डीपी फुटण्याचे प्रकार होतात, असे कर्मचारी समाधान महाजन, राजेश राजहंस, सुरेश अत्तरदे यांनी सांगितले.

जुनीच डीपी बसविली
डीपी बदलवित असताना नागरिकांनी जुनीच डीपी लावत असल्याचा आरोप केला. जुनी डीपीत पुन्हा बिघाड झाला तर? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तेव्हा डीपीतील वाईडींग नवीन असते. त्यामुळे जुन्या डीपीचा प्रश्नच नसल्याचे कर्मचार्‍यांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.