नविन आदर्श विद्यालयाचा निकाल ९८.६१ टक्के

0

पाचोरा (प्रतिनिधी) : येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित नवीन आदर्श माध्यमिक विद्यालयाचा एस.एस.सी. परीक्षेचा निकाल ९८ .६१ टक्के लागला असून परीक्षेला एस.एस.सी. परीक्षेत प्रविष्ठ ७२ विद्यार्थ्यांपैकी ७१ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. नवीन आदर्श माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी सचिन कैलास पाटील ८९.६० टक्के  गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे.

गुणानूक्रमानुसार उत्तीर्ण झालेले पहिले पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे अक्षदा नारायण पाटील (८९.२० टक्के), अंजली सूर्यकांत अहिरे (८८.६० टक्के), सूरज मोहिनीराज पाटील (८८.२० टक्के), जान्हवी सुनील रामेकर (८७.७०टक्के) सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिक पुजा शिंदे, उपमुख्याध्यापिका कल्पना पाटील, शिक्षक व शिक्षकेतर बांधवांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पंडित शिंदे, उपाध्यक्ष निरज जैन, सचिव अॅड. भैय्यासाहेब काटकर, संचालक सतीश बापू शिंदे, सहसचिव शिवाजी शिंदे व विश्वस्त मंडळाने अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.