नगर रचना कार्यालयास भाडेतत्वावर वाहने पाहिजेत

0

जळगाव – सहाय्यक संचालक, नगर रचना, जळगाव या कार्यालयाला भाडे तत्वावर  स्विप्ट, फोर्ड ॲपिअर, वेरना, इंडिको, सेडन केअर यासारखी चारचाकी वाहने इंधनविरहीत भाडे तत्वावर घ्यावयाची आहेत. इच्छूक वाहन मालकांकडून इंधनविरहीत दरपत्रक मागविण्यात येत आहेत. दरपत्रके सिलबंद पाकीटात 28 फेबुवारी, 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत नगर रचना कार्यालय, जुने बी. जे. मार्केट, डी. हॉल, दुसरा मजला, जळगाव या कार्यालयात पोहतील अशा बेताने पाठवावेत.

दरपत्रकाविषयीच्या अटी व शर्ती कार्यालयाच्या सूचना फलकावर संबंधिताना पहावयास मिळतील. असे सहाय्यक संचालक, नगर रचना, जळगाव कल्पेश पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.