धारदार चॉपर बाळगणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

0

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल 

जळगाव – शहरातील दोन तरुणांजवळ चॉपर असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन जणांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध तालुका पोलीस स्टेशनला बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि शहरातील मातोश्री शाळेजवळील रोडवर आज दुपारी एक वाजेच्या सुमारास संशयित आरोपी पवन नारायण कापसे (वय-२५) रा. वैष्णवी पार्क,याच्याजवळ धारदार चॉपर असल्याची माहिती  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती . त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील, अशोक महाजन, पोहेकॉ सुधाकर अंबोरे, अनिल देशमुख, अशरफ शेख, दिपक शिंदे, इंद्रिस पठाण यांच्या पथकाने पावन याला अटक केली असता त्याने आपला दुसरा साथीदार परेश आनंदा गोयर (वय-२६) रा. वैष्णवी पार्क हा चॉपर याच्याकडून घेतला असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.