धानो-याती प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी रांगा!

0

 धानोरा प्रतिनिधी ! चोपडा तालुक्यातील धानोरा येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात लसिकरण करुन घेण्यासाठी नागरीकांनी सकाळ पासुनच रांग लावलेली होती. यावेळी मात्र मुख्य गेटवरच नोंदणी प्रक्रीया राबवल्याने लसिकरण सुलभतेने पार पडले.दरम्यान नंबर मागेपुढे झाल्याने थोडा गोंधळ उडाला होता.मात्र लसिकरण व्यवस्थितपणे पार पडले.बाहेरगावाहुन तसेच परीसरातुन लोकांनी गर्दी केली होती.

गेल्या आठवडाभरापासुन येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नसल्याने अनेकांना माघारी फिरावे लागत होते.दि ३ व ५ रोजी आलेल्या लोकांनी लस उपलब्ध नसल्याने नाराजी व्यक्त केली होती.दि ६ रोजी लस उपलब्ध असल्याने सकाळ वाजेपासुनच लोकांनी नोंदणी करण्यासाठी गर्दी केली होती.गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी व नाव नोंदणी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जवाहरलाल महाजन,प्रशांत सोनवणे,वासुदेव महाजन यांनी नोंदणी करुन कुपन वाटण्यास मदत केली.लसिकरण रजिस्ट्रेशन साठी गावातील उच्चशिक्षित उद्धव महाजन,प्रितम महाजन,प्रसाद महाजन,विपुल सोनवणे यांनी हातभार लावला.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश कवडीवाले,नितीन लोलगे,प्रविण ठाकूर तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.आरोग्य सहाय्यिका भिकूबाई बोदडे,भारती सोनवणे यांनी लस व्यवस्थितपणे टोचली.यात पहीला डोस १०७ दुसरा १०५ लोकांनी लस टोचून घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.