धरणगाव येथे पालकमंत्री ना.पाटील यांनी केली कंटेन्मेंटझोनची पाहणी

0

 धरणगाव  | शहरातील लहान माळी वाडा नवेगाव चिंतामण मोरया परिसरातील  महिलांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचा कुटुंबातील अजून सात व्यक्तीच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने  शहरातील हे परिसर कंटेन्मेंटझोन जाहीर केल्याने आज सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केली असता नागरिकांना घरोघरी जाऊन घरातच बसण्याची विनंती केली तसेच या झोन मधील रहिवासी ना अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी नियोजन करण्याचे प्रशासनास सांगितले  परिसरातील नागरिकाना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गोळ्या चे वाटप करण्यात आले  तसेच अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये सोशल मीडिया चा माध्यमातून अफवा पसरवण्यात येत आहे तरी कोणी नि अफवांवर विश्वास ठेवू नये प्रशासना मार्फत सर्व उपाययोजना करण्यात येतील असे दै लोकशाही प्रतिनिधी विनोद रोकडे याच्याशी  बोलताना सांगितले यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ नगराध्यक्ष निलेश चौधरी गटनेते पप्पू भावे माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी  शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन चर्मकार समाजाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे तहसीलदार नितीनकुमार देवरे मुख्यधिकारी जनार्धन पवार  साह्ययक पोलीस निरीक्षक पवन देसले  नायब तहसिलदार प्रथमेश मोहड न पा प्रशासकीय अधिकारी समजून मिसर  स्थानिक नगरसेवक भागवत चौधरी विलास महाजन उपस्थित होते

 

Leave A Reply

Your email address will not be published.