वरणगावला पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ

0

वरणगाव | जिल्ह्यात भुसावळ परिसरात कोरोना आजाराने शिरकाव केल्या नतंर आज रोजी वरणगांव येथिल प्रतिभा नगरमध्ये सुद्धा कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे .

कोरोना आजाराने देशासह राज्यात शिरकाव केल्यान संचारबंदी लागु केल्याच्या शहरत ही नगर परिषदेने बंद चे व सुरक्षीत अंतर ठेवण्याचे व तोंडाला मास्क लावण्याच्या नियम लागु करण्यात आले होते मात्र या नियमाकडे शहरवाशीयानी फारसे लक्ष दिले नाही नागरिक शहरात  मुक्त संचार करीत फक्त कोरोना आजार किती भयकंर आहे यांच्या . दिवसभर गप्पा मारत बसुन सुरक्षीत अंतराच्या नियमाला आपल्या पासुन दुर ठेवत जवळपास दिड महिण्याच्या कालावधी नतंर शहरातील प्रतिभा नगर येथील 55 वर्षीय पुरुष कोरोना ग्रस्त रुग्ण  आढळल्याचा तपासणी अहवाल सायकाळच्या सुमारस  शहरात धडकताच नागरिका मध्ये एकच खळबळ उडाली असुन भितीचे वातावरण निर्माण  झाले आहे सदर इसम हा तब्बेत बिघडली असल्याने आधी भुसावळ येथील खासगी रुग्णालयात उपचारा साठी गेला होता मात्र त्याला जळगाव येथील कोवीड रुग्णालयात जाण्याचे सागीतले होते तेथे त्याच्या स्वॅबचे नमुने रविवारी  घेण्यात आले होते व त्याचा अहवाल सकारात्मक आला हा गुराचा व्यापारी असुन त्यांचा  गुरे ढोरे खरेदी विक्री  करण्याच्या निमीत्ताने अनेकाशी संबध येतो त्यामुळे त्यांच्याशी किती नागरिकाचा संबध आला यांची माहिती व  त्यांच्या परिवारातील सदस्याची माहिती घेऊन  परिवारातील सदस्यांना  भुसावळ येथील रेल्वेच्या कोवीड रुग्णालयात स्थानबध्द करण्यात येणार असल्याची माहीती डॉ देवर्षी घोषाल यांनी दिली असुन प्रतिभानगरचा संपुर्ण परिसर सिल करण्यात आला असुन नागरिकानी विनाकारण घराबाहेर पडू नका नागरिकानी सुरक्षीत अतंर ठेवुन तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधण्याचे अवाहन  केले आहे.

कोरोना रूग्णाचा तपासणी अहवाल सायकाळी प्राप्त होताच भुसावळ विभागीय अधिकारी, व तहसिलदार  यांनी शहरात हजर होऊन खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत . तर नगरपरिषद प्रशासना कडून नागरिकानी घाबरून न जाता सतर्क राहुन  विनाकारण घराबाहेर पडू नये व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे .

 

Leave A Reply

Your email address will not be published.