धरणगाव तालुका ग्रामपंचायतीत शिवसेनेचे वर्चस्व ; 35 ग्रामपंचायती सेनेकडे

0

धरणगाव : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत 47 पैकी एकूण 35 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकला असून 12 पैकी काही ठिकाणी आघाडीच्या जागा निवडून आल्या आहेत.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील व जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वा खाली धरणगाव तालुक्यातील 47 पैकी 35 जागेवर शिवसेनेचे शिलेदार निवडून आले असून काही ठिकाणी आघाडीचे सरपंच होतील या सर्व विजयी उमेदवारांचे धरणगाव येथील तहसील कार्यालया जवळ जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,तालुका प्रमुख गजानन पाटील,शहर प्रमुख राजेंद्र महाजन,नगराध्यक्ष निलेश चौधरी,न.पा.चे.सेनेचे नगरसेवक व पदाधिकारी विजयी उमेदवारांचे बुके,गुलाबाचे फुले देऊन सत्कार केला.

पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी सर्व विजयी ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन केले.

या प्रसंगी नगरसेवक वासुदेव चौधरी,भागवत चौधरी,सुरेश महाजन,नंदू पाटील, गटनेते पप्पू भावे,चर्मकार समाजाचे नेते भानुदास विसावे,सुरेश पारेराव,महिला जिल्हा उपप्रमुख सौ कल्पना ताई कापडणे,नाना ठाकरे,मुरलीधर पाटील,राहुल रोकडे,संजय धामोडे धरणगाव शहर व तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते सर्व सदस्यांच्या 27 जानेवारी रोजी पालकमंत्री यांच्या हस्ते धरणगाव न.पा.कार्यालयात सकाळी 10 वाजता सत्कार करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.