धनाजी नाना महाविद्यालयात सूर्यनमस्कार कार्यशाळा उत्साहात संपन्न

0

फैजपूर प्रतिनिधी- धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे कोरोना महामारीत रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सूर्यनमस्काराचे महत्त्व या विषयावर सहा दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या समारोप समारंभास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी व प्रमुख पाहूने म्हणून डॉ. बलवंत सिंग हे उपस्थितीत होते. प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य डॉ. अनिल भंगाळे, डॉ. उदय जगताप,प्रा. अनिल सरोदे, प्रा. डी. बी. तायडे आणि जीमखाना समिती चेअरमन प्रा. डॉ. सतीश चौधरी उपस्थीत होते.

समारोप समारंभात डॉ.बलवंत सिंग यांनी भागवत गीता,पतंजली योग योगसुत्रा मधील व हठ प्रदिपीकेतील वेगवेगळ्या श्लोकाचा अर्थ सिग्नल त्याचे महत्व सांगितले. अखिल भारतीय स्तरावर धनाजी नाना महाविद्यालयाच्या खेळाडूंनी आपली छाप निर्माण केली आहे ती चांगल्या व्यवस्थापन समिती मुळे, चांगले प्राचार्य आणि मेहनती शारीरिक शिक्षण संचालक असल्या मुळे हे शक्य झाले असे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी सर यांनी महाविद्यालय निर्मितीचा इतिहास सांगितला. महाविद्यालय हे अखंड उर्जेचा स्त्रोत आहे आणि हे उर्जेचा स्त्रोत याही पुढे तो असाच तेवत राहुन या परिसरातील मुलांना पुढे जाण्यास मार्गदर्शन करतराहील असे सांगितले. कार्यशाळेचे प्रस्तावित डॉ. सतीश चौधरी यांनी रावेर-यावल तालुक्याचे विद्यमान आमदार व संस्थेचे अध्यक्ष यांच्या प्रेरणेतून ही कार्यशाळा संपन्न होत आहे व या कार्यशाळेस २१० व्यक्तींनी नोंदणी करून ही कार्यशाळा यशस्वी केली आहे असे सांगितले. कार्यशाळेस हरियाणा, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्य़ातील अनेकांनी सहभाग घेतला. सहभागी व्यक्तींतर्फे मनोगत नांदेड जिल्ह्य़ातील डॉ. बालाजी जाधव व लातूर जिल्ह्य़ातील डॉ. करंजकर आणि महिलातर्फे डॉ. प्रतिभा ढाके यांनी व्यक्त केले. समारोप समारंभाचे सुत्र संचलन डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे यांनी व अभार प्रा. शिवाजी मगर यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.